तिथी
|
वैशाख शुक्ल ६ (१०:०६)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
पुष्य (२२:४४)
|
योग
|
गंड (१९:५४)
|
करण
|
गरज (२२:०२)
|
गंगोत्पत्ति-गंगापूजन
गंगासप्तमी अगर
जन्हुसप्तमी ही वैशाख शुक्ल सप्तमी दिवशी करतात. या दिवशी गंगामाता पुन्हा प्रकट
झाली. या दिवशी गंगेचे पूजन करतात.
ब्रह्मपुराणातून 'पृथ्वी चन्द्रोदय' ग्रंथात असे
सांगितले आहे की, राजर्षी जन्हूने प्रथम गंगेला क्रोधाने प्राशन
करुन टाकली होती. नंतर सप्तमी दिवशी ती राजाच्या कानातून कन्येच्या रुपाने
दिगंबरावस्थेत प्रकट झाली. म्हणून त्यादिवशी अशाच गंगेचे पूजन केले पाहिजे.
हरिवंशात
पुण्यकव्रतानंतर (शेवटी) हे व्रत सांगितले आहे. गंगेने हे व्रत पार्वतीला सांगितले
आहे, म्हणून आजही पार्वतीच्यासाठी हे व्रत केले जाते.
या दिवशी
प्रात:काली विधिपूर्वक गंगास्नान करावे. माघ शुक्ल सप्तमी दिवशी दुसर्याही
तीर्थात स्नान करता येते. या व्रताने सर्व कामना पूर्ण होतात, म्हणून या व्रताला 'सर्व-कामप्रद' असे म्हणतात. जी स्त्री हे व्रत करते , तिच्या सासर, माहेर व आजोळच्या सात
पिढ्यांचा उध्दार होतो. या दिवशी एक सहस्त्र कुंभ दान करावेत , असे आहे. हे व्रत तारण, पारण, सर्वकामप्रद आहे.
अन्य पुराणातही
या व्रताचा उल्लेख मिळतो. वैशाख शुक्ल सप्तमी दिवशी परमेश्वराची पूजा करवी. गंगेत
यथाविधी आंघोळ करुन गंगेत पितृतर्पण करावे. दहा ब्राह्मणांना भोजन घालावे.
चांगल्या पुष्पमाला, चंदनाच्या गंधाने व तलम वस्त्रांनी त्यांचे
पूजन करावे. याने पूजक सर्व पातकातून मुक्त होतो. हे व्रत मध्यान्हव्यापिनी
सप्तमीला करतात. जर दोन दिवश तशी सप्तमी असेल तर ' षष्ठीविद्धा' सप्तमी' गंगासप्तमी ' मानतात व हे शिष्टसंमत आहे. कारण सप्तमी व्रताच्या
निर्णयप्रसंगी ' षष्ठीयुक्त ' सप्तमीच धरावी, असा युग्मवाक्य-निर्णय आहे.
श्रीनृसिंह नवरात्रारंभ
या दिवशी श्रीनृसिंह
नवरात्र आरंभ होत आहे. ज्यांचे कुलदैवत
नरसिंह आहे , त्यांच्या घरी वैशाख पोर्णिमेपर्यंत
नृसिंह-नवरात्र असते. नवरात्रकलत नित्यपूजा, अभिषेक, पुराणवाचन, ब्राह्मण-संतर्पण इ. विधी
होतात.
गुरुपुष्यामृत
सुर्योदयापासून २२:४४
पर्यंत गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे होणारा सुवर्ण संचयासाठी शुभ आणि
विवाहासाठी वर्ज असणारा अमृतसिद्धी योग होत आहे. हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
घबाड
१०:०६ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३
राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: कृत्तिका
चंद्र
नक्षत्र : पुष्य
तिथी: ६
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६
x ३ = १८
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे ६ तिथी
मिळवू : १८ + ६ = २४
आता
७ ने भागू २४ / ७ = ३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
दग्ध योग
१०:०६ पर्यंत गुरुवारी
षष्ठी तिथी असल्यामुळे होणारा दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ
कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment