Tuesday, 31 May 2016

दिनविशेष - १ जून - २०१६


तिथी
 वैशाख कृष्ण ११ (२१:५०)  
वार
 बुधवार     
नक्षत्र
 रेवती (२२:३९)
योग
 आयुष्यमान (११:०३)
करण
 बव (११:१८)

अपरा एकादशी


हे एकादशी व्रत करणार्‍याने दशमी दिवशी जव , गहू, मूग आदी पदार्थ असलेले भोजन एकवेळ करावे. एकादशी दिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे करून उपवास करावा व द्वादशी दिवशी पारणे करून जेवावे. या एकादशीचे 'अपरा- अपार फल देणारी' असे नाव आहे. या व्रताच्या आचरणाने अपार पापे दूर होतात. जे चांगले वैद्य असूनही गरिबांना औषध देत नाहीत, दशग्रंथी विद्वान असूनही अनाथ मुलांना शिकवत नाहीत , चांगले शासक (राजा) असूनही प्रजेचा सांभाळ करीत नाहीत , बलवान असूनही दीनदुबळ्यांना संकटमुक्त करत नाहीत आणि श्रीमंत असूनही संकटग्रस्त कुंटुबांना मदत करीत नाहीत, ते नरकात जाण्यासच योग्य असतात. परंतु 'अपरा' एकादशीचे व्रत केले असता त्याच्या प्रभावाने ते देखील वैकुंठाला जातात.

मृत्यु योग

२२:३९ नंतर बुधवारी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे मृत्युयोग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो. 

२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment