तिथी
|
वैशाख कृष्ण १ (२८:२७)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
अनुराधा (२१:३४)
|
योग
|
शिव (२५:२४)
|
करण
|
बालव (१५:३८)
|
देवर्षी नारद जयंती
वैशाख
कृष्ण प्रतिपदा ही नारदाची जन्मतिथी देवर्षी नारद जयंती म्हणून साजरी केली जाते.
पुराणांनुसार
भारतातील ऋषीमुनींपैकी फक्त नारदमुनींनाच देवर्षी ही पदवी मिळाली होती. जवळपास
सर्वच हिंदू ग्रंथांमध्ये उल्लेख आढळणारे ते एकमेव ऋषी आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर युगातही
नारदमुनी देवी-देवतांमध्ये संवादाचे माध्यम होते. सदैव सतर्क राहणारे नारद हे
ब्रह्मदेवाच्या मुलांपैकी सनक, सनंदन, सनत आणि सनातन या सर्वांपेक्षा
लहान होते. ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानानुसार आकाश, पाताळ तसेच पृथ्वी या तिन्ही लोकी भ्रमण करून नारद
देव, संत-महात्मे, इंद्रादी शासक आणि जनमानसाशी थेट
संवाद साधून त्यांची सुख-दु:खे जाणून घेत अडचणी निवारण्यासाठी प्रयत्न करत.
म्हणूनच तर ते देवांना जेवढे प्रिय होते, तेवढेच
ते राक्षसांमध्येही प्रिय होते. यासोबतच देव आणि दानवांमध्ये संघर्ष निर्माण करणे
किंवा युद्ध भडकवणे हा त्यांचा ‘कळलावा’ गुणही प्रसिद्ध आहे. यामुळे
त्यांना अनेकदा अपमानितही व्हावे लागले आहे. मात्र, समाजहित हाच एकमेव उद्देश असलेल्या नारदाने
मान-अपमानाची कधीच पर्वा केली नाही. त्यांना विश्वातील आद्य पत्रकार म्हणून ओळखले
जाते.
भारतीय जेष्ठ मासारंभ
भारतीय कालगणनेनुसार जेष्ठ
मास आरंभ होत आहे.
मृत्यु योग
२१:३४ पर्यंत रविवारी
अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यु योग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील
स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
इष्टि
इष्टि म्हणजे
यज्ञ.
यज्ञ
संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि
म्हणतात.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment