तिथी
|
वैशाख शुक्ल १४ (२४:४२)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
स्वाती (१६:२८)
|
योग
|
वारीयान (२४:२०)
|
करण
|
गरज (११:३५)
|
श्रीनृसिंह जयंती
वैशाख
शुक्ल चतुर्दशीला श्रीनृसिंह जयंती असते. ज्या दिवशी सूर्यास्त काळी चतुर्दशी असेल
तो दिवस घ्यावा. या चतुर्दशीस (पूर्वविद्धा म्हणजे त्रयोदशीयुक्त असेल तर अजून उत्तम) स्वाती नक्षत्र आणि शनिवार आणि वणिज करण असा योग
आल्यास तो अतिशय उत्तम मनाला जातो. व नृसिंहजयंती व्रत करणार्यास सौभाग्य प्राप्त होते. जरी
यातील एखादाही योग असेल तर तो दिवस पापनाशक आहे. यंदा १६:२८ पर्यंत स्वाती नक्षत्र
आहे.
नृसिंहजयंती
व्रत:
हे व्रत वैशाख शुक्ल चतुर्दशीला करतात. ही चतुर्दशी प्रदोषव्यापिनी पाहिजे. जर
दोन दिवशी अशी चतुर्दशी असेल अगर दोन्ही दिवशी नसेल तर ( मदनतिथी ) त्रयोदशीचा
संसर्ग टाळण्यासाठी दुसर्या दिवशीचीच तिथी घ्यावी. उपवास करावा. व्रताच्या दिवशी
पहाटे सूर्याला व्रत करणार असल्याचे सांगुन तांब्याच्या कलशात पाणी भरावे व पुढील
मंत्राने संकल्प सोडवा.
नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे ।
उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जित: ॥
मध्यान्ही नदीवर जाऊन तीळ, गाईचे शेण, माती आणि आवळे यांनी मर्दन करुन वेगवेगळे चार वेळा स्नान करावे. नंतर पुन्हा
शुद्ध स्नान करुन तेथे नित्य आन्हिक करावे. नंतर घरी यावे व क्रोध, लोभ, मोह, असत्य भाषण , कुसंग व पापाचरण यांचा
त्याग करावा. ब्रह्मचर्य पाळावे आणि उपवास करावा. संध्याकाळी चौरंगावर अष्टदल
काढून त्यावर सिंह, नृसिंह आणि लक्ष्मी यांच्या सुवर्णप्रतिमा प्राणप्रतिष्ठापूर्वक स्थापन करून
त्यांची षोडशोपचारपूर्वक पूजा करावी. ( किंवा पौराणिक मंत्रांनी पंचोपचारांनी पूजा
करावी) . रात्री गायनवादन, पुराणश्रवण, हरिकीर्तन, जागरण करावे. दुसरे दिवशी ब्राह्मणभोजन घालून परिवारासह स्वत: भोजन करावे. या
प्रमाणे प्रतिवर्षी करण्याने नृसिंह-भगवान त्याचे सर्व ठिकाणी रक्षण करतात व
यथेच्छ धनधान्य देतात .
भय मुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. श्रीनृसिंहजयंती दिवशीच हे व्रत करतात.
गव्हाच्या पिठाचे शिवलिंग करून त्याची स्थापना करतात व त्याची यथासांग पूजा करतात.
काही ठिकाणी हे नृसिंहजयंतीच्या बरोबरच करतात. दोन्ही देवांची पूजा एकत्र करतात.
मिथुनायन
२०:०६ ला रवि सायन मिथुन
राशीत प्रवेश करीत आहे.
भद्रा
२४:४२ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.
विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment