तिथी
|
वैशाख शुक्ल ४ (१२:३०)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
आर्द्रा (२२:५२)
|
योग
|
धृति (२३:१९)
|
करण
|
बव (२३:३५)
|
विनायक चतुर्थी (अंगारक योग)
मंगळवारी चतुर्थी
आल्यास त्यास अंगारकी चतुर्थी म्हणतात. मंगळवारच्या दिवशी चतुर्थी हा योग अत्यंत
शुभ आणि कार्यसिद्धि देणारा असतो. गणेश अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केल्याने
वर्षभर चतुर्थी केल्याचे फल मिळते.
अंगारकी गणेश चतुर्थी कथा
गणेश चतुर्थी
सोबत अंगारक हे नाव असणे मंगळाचे सानिध्य दर्शविते. पौराणिक कथेनुसार पृथ्वीचा
पुत्र मंगळ देवाने भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी खूप कठोर तप केले. मंगळ
देवाची तपस्या आणि भक्ति ने प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्याना दर्शन दिले आणि
आपल्या बरोबर रहाण्याचा आशिर्वाद दिला. मंगळ देवाना तेज आणि रक्तवर्ण यामुळे
अंगारक हे नाव मिळाले आहे. याचमुळे या चतुर्थीला अंगारक चतुर्थी म्हणतात.
श्रीरामानुजाचार्य जयंती
रामानुजाचार्य
यांचा जन्म १०१७ साली दक्षिण भारतात तमिळनाडुमध्ये झाला. व मृत्यु ११३७साली
श्रीरंगम, तामिळनाडू येथे झाला. ते विशिष्टाद्वैत
वेदांताचे प्रवर्तक होते. भक्ति परम्परेवर मोठा प्रभाव असणारे असे ते वैष्णव संत
होते.
त्यांनी अनेक
ग्रंथांची रचना केली असली तरी ब्रह्मसूत्रावर भाष्य करणारे दोन मूळ ग्रंथ 'श्रीभाष्यम्' आणि 'वेदान्त संग्रहम्' अतिशय प्रसिद्ध आहेत.
रवि कृत्तिका नक्षत्र प्रवेश
२९:४९ ला रवि कृत्तिका
नक्षत्रात प्रवेश करीत आहे.
दग्ध योग
१२:३० नंतर मंगळवारी पंचमी
तिथी असल्यामुळे होणारा दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे.
पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
भद्रा
१२:३० पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
यमघंट योग
२२:५२ पर्यंत मंगळवारी
आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे होणारा यमघंट होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व
शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
|
सोमवार – विशाखा
|
मंगळवार – आर्द्रा
|
बुधवार – मूळ
|
गुरुवार – कृत्तिका
|
शुक्रवार – रोहिणी
|
शनिवार – हस्त
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment