Tuesday, 17 May 2016

दिनविशेष - १८ मे २०१६


तिथी
 वैशाख शुक्ल १२ (१९:५२)  
वार
 बुधवार     
नक्षत्र
 हस्त (१०:२५)
योग
 सिध्दि (२२:२७)
करण
 बव (६:३५)

जाम्यदग्न्य द्वादशी

वैशाख शुक्ल द्वादशीला जामदग्न्य द्वादशी असे नाव आहे. त्या दिवशी परशुरामाच्या सुवर्णमूर्तीची पूजा करावी, असे सांगितले आहे.
फल- पराक्रमी पुत्राची प्राप्ती.

मधुसूदन पूजा

वैशाख शुक्ल द्वादशीला भगवान मधुसूदनाची पूजा करावी व व्रत करावे. त्यामुळे अग्नीष्टोम केल्याचे फळ मिळते. जर या दिवशी बुध व मंगळ सिंह राशीत व सूर्य मेष राशीत असातील , तसेच हस्तनक्षत्र व व्यतिपातयोग असतील तर या सुयोगावर अन्न, वस्त्र, सुवर्ण , गाय व भूमी दान देण्यामुळे सर्व प्रकारची पापे दूर होऊन देवत्व, इंद्रत्व, नृपतित्व आणि आरोग्य यांची प्राप्ती होते.

घबाड

१०:२५ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: कृत्तिका
चंद्र नक्षत्र : हस्त
तिथी:१२        
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

No comments:

Post a Comment