Tuesday, 5 April 2016

दिनविशेष - १२ एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र शुक्ल ६ (२२:४१)  
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 मृग (१४:५४)
योग
 शोभन (१६:४९)
करण
 कौलव (११:२९)

कार्तिकस्वामीला दवणा वाहणे

या दिवशी कार्तिकस्वामीला दवणा वाहाव्यात.

कुमारव्रत व कार्तिकेय पुजन

चैत्र शुक्ल षष्ठीची देवता कार्तिकस्वामी. या दिवशी मयूरवाहन कार्तिकस्वामींची मूर्ती करुन तिची पूजा करतात. या व्रतात उपोषण व ब्राह्मीचा रस आणि तूप यांचे प्राशन करावयाचे असते.
फल-बुद्धिमत्ता, शास्त्र व पांडित्य यांचा लाभ.

अशोकष्ष्ठी

हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शुक्ल षष्ठीस हे व्रत करतात. या व्रतास षष्ठीदेवीचे पूजन करतात व अशोकाच्या सहा कळ्या व सहा मुगाचे दाणे मिसळून दह्याबरोबर खातात.
फल- सुख व अपत्यप्राप्ती. 

घबाड

१४:५४ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: रेवती
चंद्र नक्षत्र : मृग
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

यमघंट योग

१४:५४ नंतर मंगळवारी आर्द्रा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment