Tuesday, 5 April 2016

दिनविशेष - २० एप्रिल २०१६


तिथी
 चैत्र शुक्ल १४ (अहोरात्र)  
वार
 बुधवार     
नक्षत्र
 हस्त (२८:१४)
योग
 व्याघात (१४:४५)
करण
 गरज (१९:०३)

नृसिंह दोलोत्सव

श्री नृसिंहाची पूजा करून झोपाळ्यावर स्थापना करावी. ही मूर्ती ताम्हणात घेऊन पूजा करून झोपाळ्यात ठेवावी.

महादेवाला दवणा वाहणे

या दिवशी महादेवाला दवणा वहाव्यात.

दमनचतुर्दशी

हे एक व्रत होय. चैत्र किंवा श्रावण महिन्याच्या शुक्लचतुर्दशीला हे व्रत करतात. एकवीरा व भैरव या या व्रताच्या मुख्य देवता होत. या दोन देवतांच्या बरोबरच रात्री संचार करणार्‍या इतरही शक्तिदेवता असतात. त्यांच्याही प्रीत्यर्थ हे व्रत करावयाचे असते. म्हणून या व्रताची पूजा रात्री करतात. त्या पूजेत शिवाला दुधांचा व उसाच्या रसाचा अभिषेक करतात. दवणा, बेल व मरवा यांनी देवाची पूजा बांधतात. नैवेद्यानंतर तांदळाच्या पिठाने पाच किंवा नऊ दिवे करतात व ते काशाच्या पात्रात ठेवून देवाची आरती करतात. शक्य असल्यास रात्री देवाची रथयात्रा काढतात. शेवटी शिवभक्तांची पूजा करून भोजन घालतात.
फल- पुण्य व सौख्य यांची प्राप्ती.

मदन चतुर्दशी

हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शुक्लचतुर्दशीला मदनचतुर्दशी म्हणतात. हिला मदनभंजी असेही नाव आहे. या दिवशी मदनाची पूजा करतात. त्यास संतुष्ट करण्यासाठी गायन, वादन, कमोत्तेजक बोलणे असे प्रकार करतात.
फल- इच्छाप्राप्ती.

वृद्धितिथी

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.

क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शुक्ल १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment