तिथी
|
चैत्र कृष्ण ८ (२०:३७)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
श्रवण (२१:५५)
|
योग
|
शुभ (१६:२१)
|
करण
|
बालव (८:५९)
|
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
जानकी व्रत
हे व्रत चैत्र
कृष्णअष्टमीला करतात. यात जनककन्या जानकीची पूजा करतात. श्रीगुरु वसिष्ठांच्या
आज्ञेवरुन श्रीरामचंद्राने समुद्रतटावर असलेल्या तपोभूमीवर बसून हे व्रत केले
होते. या व्रतात भाताचे हवन करावे व अनरशांचा नैवेद्य दाखवावा. आपल्या मनोकामना
पूर्ण होण्याकरिता हे व्रत अवश्य करावे.
भैरव- शीतल अष्टमी
चैत्र
कृष्णअष्टमी दिवशी शीतलादेवीचे पूजन करतात. प्रथम थंड पाण्याने आणि नंतर दुधाने
देवीला स्नान घालून भाताचा नैवेद्य दाखवतात. अन्य उपचारही अर्पण करतात.
त्याचप्रमाणे भैरवाचीही पूजा करतात. म्हणून या व्रताला भैरव-शीतला अष्टमी असे
म्हणतात.
दग्ध योग
२०:३७ नंतर शनिवारी नवमी तिथी
असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
संदर्भ :
दाते
पंचांग
सुलभ
ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment