तिथी
|
चैत्र कृष्ण २ (१५:३५)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
विशाखा (१३:०६)
|
योग
|
व्यतीपात (१८:२४)
|
करण
|
वणिज (२८:३६)
|
ब्रह्मोत्सव
व्रज मंडळात
साजरा होणारा एक उत्सव. चैत्र कृष्ण द्वितीयेपासून एकादशीपर्यंत प्रामुख्याने
वृंदावनातल्या रंगनाथमंदिरात हा उत्सव होतो. रामानुज सांप्रादायातील हा सर्वात
महत्वाचा उत्सव होय. उत्सवाच्या या कालात रंगनाथाला निरनिराळी वाहने करतात व
त्याची मिरवणूकही काढतात. वद्य नवमीला रथयात्रा असते. या उत्सवात गावातील सर्व लोक
बहुसंख्येने सामील होतात.
भद्रा
२८:३६ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.
मृत्यूयोग
१३:०६ नंतर रविवारी अनुराधा
नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो.
असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने वंग प्रांतात पहिला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment