तिथी
|
निज जेष्ठ शुक्ल १० (२७:२०)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
चित्रा (२६:०८)
|
योग
|
परीघ (२५:०६)
|
करण
|
तैतिल (१५:१५), गरज (२७:२०)
|
अयन करिदिन
दक्षिणायनाचा दुसरा दिवस
म्हणून हा अयन करिदिन आहे.
ग्रहण
दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व
प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात.
हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.
भारतीय आषाढ मासारंभ
भारतीय कालगणनेनुसार आषाढ
मास आरंभ होत आहे.
रवि आर्द्रां नक्षत्र प्रवेश
रवि ११:११ ला आर्द्रा नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे
मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला
जातो.
रवि
नक्षत्र : आर्द्रा
चंद्र
नक्षत्र: चित्रा
वाहन हत्ती
रवि
नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते
त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
|
वाहन
|
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
|
१
|
घोडा
|
पर्वतावर पाऊस पडेल
|
२
|
कोल्हा
|
पाऊस पडणार नाही.
|
३
|
बेडूक
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
४
|
मेंढा
|
पाऊस पडणार नाही.
|
५
|
मोर
|
अल्पवृष्टी होईल.
|
६
|
उंदीर
|
अल्पवृष्टी होईल.
|
७
|
महिष
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
८
|
गाढव
|
अल्पवृष्टी होईल.
|
० / ९
|
हत्ती
|
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
|
रवि
नक्षत्र : आर्द्रा
चंद्र
नक्षत्र: चित्रा
अंतर: ९
९
ला ९ ने भागले असता बाकी राहते ०(शून्य). म्हणून वाहन हत्ती आहे. याचाच अर्थ रवि
आर्द्रा नक्षत्रात असताना भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
नक्षत्रसंज्ञा : चं सू
सूर्य नक्षत्रे
|
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा,
जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
|
चंद्र नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा,
पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती
|
दोन्ही सूर्य नक्षत्रे
|
वारा सुटेल
|
दोन्ही चंद्र नक्षत्रे
|
पाऊस पडणार नाही
|
एक चंद्र व दुसरे सूर्य
|
पाऊस पडेल
|
रवि
नक्षत्र : आर्द्रा = चंद्र
नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: चित्रा = सूर्य नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि आर्द्रा नक्षत्रात चांगली पर्जन्यवृष्टी होईल.
स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री, स्त्री
स्त्री नक्षत्रे
|
आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा,
मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
|
पुरुष नक्षत्रे
|
अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी,
मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा
,उत्तराभाद्रपदा, रेवती
|
नपुंसक नक्षत्रे
|
विशखा, अनुराधा, जेष्ठा
|
सूर्य
नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री
पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि
नक्षत्र : आर्द्रा = स्त्री
नक्षत्र
चंद्र
नक्षत्र: चित्रा = स्त्री नक्षत्र
दोन्ही
स्त्री नक्षत्रे आहे. त्यामुळे रवि आर्द्रा नक्षत्रात असताना पाऊस पडेल.
पावसाचा
अंदाज घेताना या बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह
स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल १० आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment