तिथी
|
निज जेष्ठ शुक्ल ९ (२७:१९)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
हस्त (२५:२७)
|
योग
|
वरीयान (२६:०६)
|
करण
|
बालव (१५:३१), कौलव (२७:१९)
|
महेश नवमी
जेष्ठ
शुद्ध नवमीस महेश नवमी असेही म्हणतात.
यादिवशी भगवान
श्री शंकर आणि मत पार्वती यांचे पूजन केले जाते. महेश्वरी समाजाची निर्मिती या
दिवसापासून झाली अशी मान्यता आहे. त्यामुळे महेश्वरी समाजात हा उत्सव मोठ्या
प्रमाणात साजरा केला जातो.
महेश नवमी कथा
माहेश्वरी
समाजाचे पूर्वज क्षत्रिय वंशाचे होते. एकदा शिकार करीत असताना त्यांच्या
शिकारीमुळे ऋषींच्या यज्ञात विग्घ्न उत्त्पन्न झाले. त्यामुळे त्या ऋषींनी शाप
दिला कि "तुमच्या वंशाचा नाश होईल". माहेश्वरी समाजाला हा शाप लागला
होता. मात्र जेष्ठ शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान श्री शाकारांच्या कृपेने ते शापमुक्त
झाले तर झालेच आणि शंकरांनी या समाजाला आपले नाव पण दिले. तेव्हापासून हा समाज
"महेश्वरी" या नावाने ओळखला जातो. भगवान श्री शंकरांच्या आज्ञेनुसार
माहेश्वरी समाजाने क्षत्रिय कर्म सोडून वैश्य कर्म करायला सुरवात केली.
उमाब्राह्मणी
ज्येष्ठ शुक्ल
नवमी दिवशी उपवास करावा. ब्राह्मणी नावाने ख्यात गौरवर्णीय पार्वतीची भक्तिभावाने
पूजा करावी. ब्राह्मण व ब्राह्मणकन्येला दूधभाताचे जेवण घालावे व रात्री स्वतः
भोजन करावे.
अंतरराष्ट्रीय योग दिवस
अंतरराष्ट्रीय
योग दिवस २१ जून रोजी साजरा केला जातो. हा
उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा / दीर्घ दिवस असतो. आणि योग देखील मनुष्याला दीर्घ
आयुष्य प्रदान करतो. पहिल्यांदा हा दिवस २१ जून २०१५ रोजी साजरा करण्यात आला.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसभेत आवाहन
केल्यांनतर ११ डिसेंबर २०१४ रोजी १९३ सदस्यांनी या प्रस्तावाला मजूरी दिली.
योगसाधना करून हा दिवस
साजरा केला जातो.
दक्षिणायनारंभ
अयन म्हणजे जाणे. चलन होणे.
सूर्य दररोज पूर्व
क्षितिजावर एकाच बिंदूत उगवलेला दिसत नाही. तो सुमारे सहा महिने उत्तरेकडे व
सुमारे सहा महिने दक्षिणेकडे उगवत असलेला दिसतो.
सूर्याभोवती परिभ्रमण
करणाऱ्या पृथ्वीचा आस २३|| अंशाने कलता आहे. या कारणामुळे सूर्याचा दैनिक मार्ग
उत्तर व दक्षिण असा सरकत जातो. पूर्व बिंदूच्या उत्तरेस २३|| अंशापर्यंत सरकत
जाण्याची मर्यादा सूर्याने गाठली कि २१ जून पासून तो दक्षिणेस येण्यास सुरवात
होते. त्यास दक्षिणायन म्हणतात.
या दिवशी उत्तर गोलार्धात
सर्वात मोठा दिवस असतो व दक्षिण गोलार्धातील सर्वात लहान दिवस. यांनतर हळू हळू
उत्तर गोलार्धात दिनमान कमी कमी होऊ लागते. तर या उलट स्थिती दक्षिण गोलार्धात
अनुभवास येते.
कर्कायन
१५:३७ ला रवि सायन कर्क राशीत प्रवेश करत
आहे.
याचा पुण्यकाल सूर्योदय ते १५:३७
असा आहे.
सौर वर्षाऋतु प्रारंभ
कालगणनेच्या सौर
पद्धतीनुसार वर्षा ऋतुचा आरंभ होत आहे.
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल ९ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment