Thursday, 21 June 2018

दिनविशेष - २४ जून २०१८


तिथी
 निज जेष्ठ शुक्ल १२ (२८:५५)   
वार
 रविवार
नक्षत्र
 विशाखा (२९:०१)
योग
 सिध्द (२४:१८)
करण
 बव (१६:२०), बालव (२८:५५)


तिथीवासर / हरीवासर

१०:०८ पर्यंत तिथीवासर आहे. द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात.वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.

एकादशी व्रताचे फलप्राप्ती करीता सोने साखर व जलकुंभ दान करावे.

चंपक द्वादशी

जेष्ठ शुक्ल द्वादशीचे नाव चंपक द्वादशी असेहि आहे. या दिवशी चंपक पुष्पांनी गोविंदाची पूजा करावी, असे सांगितले आहे.
फल-विष्णुलोक प्राप्ती

राघव द्वादशी

जेष्ठ शुक्ल द्वादशीला राघव द्वादशी असेही नाव आहे. हे काम्य व्रत आहे. त्याचा विधी असा- रामलक्ष्मणांच्या सुवर्णमूर्तीची पूजा करावी. त्यावेळी प्रत्येक अवयवाची निरनिराळ्या नावांनी पूजा करावी. नंतर एक घृतपात्र दान द्यावे.
फल-पापनाश व स्वर्गवास.

घबाड

२८:५५ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: आर्द्रा
चंद्र नक्षत्र : विशाखा
तिथी: शुक्ल १२ = १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्ध योग

२८:५५ पर्यंत रविवारी द्वादशी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी


मृत्यू योग

२९:०१ नंतर रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ शुक्ल १२ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment