Wednesday, 4 May 2016

दिनविशेष - ५ मे २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण १३ (८:२९), चैत्र कृष्ण १४ (२८:४७)   
वार
 गुरुवार     
नक्षत्र
 रेवती (१३:१८)
योग
 प्रीति (२१:३०)
करण
 विष्टि (१८:३९)

शिवरात्रि

कृष्ण चतुर्दशीला शिवरात्रि साजरी करतात. निशीथ काळी (रात्रीचा आठवा मुहूर्त) शिवपूजेचे विशेष महत्व आहे.

पिशाच चतुर्दशी

चैत्र कृष्ण चतुर्दशीला 'पिशाच चतुर्दशी' हे नाव आहे. या दिवशी रात्री शिवाची पूजा करावी. तसेच निकुंभ नावाच्या शिवभक्ताची पूजा करावी. गोठ्यात, नदीत, रस्त्यावर वा मंदिराच्या शिखरावर पिशाचांना बली द्यावा, असा या व्रताचा विधी सांगितला आहे.
फळ- पिशाचबाधा-निवारण.

भद्रा

८:२९ नंतर १८:३९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

क्षय दिन

ज्या तिथीला कोणताही सूर्योदय होत नाही ति क्षय तिथी असते.
लागोपाठच्या दोन सूर्योदयाच्या वेळी एकचतिथी असेल तर तिला तिथी वृद्धी म्हणतात.
क्षय तिथी, वृद्धी तिथी, कृ. १३, कृ १४, अमावास्या व शु. १ या सहा तिथी शुभ कार्यासाठी पूर्णपणे अशुभ सांगितलेल्या आहेत.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Tuesday, 3 May 2016

दिनविशेष - ४ मे २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण १२ (११:५६) 
वार
 बुधवार     
नक्षत्र
 उत्तराभाद्रपदा (१६:०१)
योग
 विष्कंभ (२५:३५)
करण
 गरज (२२:१५)

प्रदोष

सूर्यास्तानंतर पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने  साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास करतात.
कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया प्रदोषव्रतमहं करिष्ये'

 इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व षोड्शोपचारे पूजा करावी.

भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥

भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
 या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची प्रार्थना करावी.  

ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !! "
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे  कायमचे नाहिशे होवोत.)

हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø  सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø  मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी भौम प्रदोष करावा.
Ø  शुक्रवार: सौभाग्य किंवा स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø  शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा. 
Ø  रविवार: आयुर्दायासाठी अर्कप्रदोष हे व्रत करावे.

                     

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

Monday, 2 May 2016

दिनविशेष - ३ मे २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण ११ (१४:५८) 
वार
 मंगळवार     
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (१८:२०)
योग
 ऐंद्र (८:५४), वैधृति (२९:२६)
करण
 कौलव (२५:३१)

वरूथिनी एकादशी

चैत्र कृष्ण एकादशीला 'वरूथिनी एकादशी' म्हणतात. हे एकादशीचे व्रत केल्याने ऐश्‍वर्य प्राप्त होते. मांघाता, धुंधुमार इ. अनेक राजांनी हे व्रत करुन स्वर्ग मिळविला अशी कथा पद्मपुराणात आहे. तसेच , या व्रतामुळे मनुष्य सर्व पापतापातून मुक्त होतो, त्याला अनंत शांती मिळते व उत्त्मलोक प्राप्त होतात.
व्रत करणार्‍याने दशमी दिवशी एक वेळ हविष्यान्न घ्यावे. काशाचे भांडे, मांस, मसूरादी पदार्थ वर्ज्य करावेत. नंतर एकादशीस उपवास करावा. त्या दिवशी द्यूत, झोप आदींचा त्याग करावा. रात्री परमेश्‍वराचे नामस्मरण करीत जागरण करावे. द्वादशी दिवशी मांस, कास्यपात्र वगैरे सोडून पारणे करावे. (खरे तर, द्यूत, मद्यमांस, कासे आदींचा नेहमीच त्याग करावा)

श्रीवल्लभाचार्य जयंती


भक्तिकालीन सगुणधारेच्या कृष्णभक्ति शाखेचे आधारस्तंभ आणि पुष्टिमार्गाचे प्रणेता श्रीवल्लभाचार्य (इ.स. १४७९-१५३१) यांचा जन्म विक्रम संवत् १५३५ च्या कृष्ण एकादशीला दक्षिण भारतातील कांकरवाड या गावी झाला.  तैलंग ब्राह्मण श्रीलक्ष्मणभट्ट आणि त्यांची पत्नी इलम्मागारू यांचे ते पुत्र होते. सध्या त्यांचे जन्मस्थान छत्तीसगढ़ मधील रायपुर जवळ चम्पारण्य इथे आहे. श्रीवल्लभाचार्य यांना वैश्वानरावतार (अग्नि चा अवतार) मानले जाते. ते वेद्शास्त्रात पारंगत होते. त्यांनी विविध भाषांमध्ये लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी १६ ग्रंथ हे 'षोडश ग्रन्थ' या नावाने प्रसिद्ध आहेत.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र

इंटरनेट

वरूथिनी एकादशी कथा

चैत्र कृष्ण एकादशीला 'वरूथिनी एकादशी' म्हणतात. हे एकादशीचे व्रत केल्याने ऐश्‍वर्य प्राप्त होते. मांघाता, धुंधुमार इ. अनेक राजांनी हे व्रत करुन स्वर्ग मिळविला अशी कथा पद्मपुराणात आहे. तसेच , या व्रतामुळे मनुष्य सर्व पापतापातून मुक्त होतो, त्याला अनंत शांती मिळते व उत्त्मलोक प्राप्त होतात.
व्रत करणार्‍याने दशमी दिवशी एक वेळ हविष्यान्न घ्यावे. काशाचे भांडे, मांस, मसूरादी पदार्थ वर्ज्य करावेत. नंतर एकादशीस उपवास करावा. त्या दिवशी द्यूत, झोप आदींचा त्याग करावा. रात्री परमेश्‍वराचे नामस्मरण करीत जागरण करावे. द्वादशी दिवशी मांस, कास्यपात्र वगैरे सोडून पारणे करावे. (खरे तर, द्यूत, मद्यमांस, कासे आदींचा नेहमीच त्याग करावा)

वरूथिनी एकादशी कथा

युधिष्ठिर म्हणाला, 'वासुदेवा, तुम्हाला नमस्कार असो. चैत्र वद्य एकादशीचे नाव काय व तिचा महिमा काय? ते मला सांग.'
श्रीकृष्ण म्हणाले, 'राजा, या एकादशीचे नाव वरूथिनी आहे. ती या लोकी आणि परलोकीसौभाग्य मिळवून देणारी आहे. या वरूथिनी एकदशीच्या व्रतामुळे निरंतर सुख मिळते. पाप नष्ट होते आणि सौभाग्यप्राप्ती होते. जी दुर्भागी स्त्री हे व्रत करील तिला सौभाग्य प्राप्त होईल. ही एकादशी सर्व लोकांना इष्टभोग व मुक्ती मिळवून देणारी आहे. या एकादशी व्रतामुळे मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात आणि जन्ममरणाचा त्याचा फेरा बंद होऊन त्याची गर्भवासातून कायमची मुक्तता होते. वरूथिनीचे व्रत करूनच मांधता स्वर्गाला गेला. धुंदुमार वगैरे अनेक राजे हे व्रत करूनच मांधाता स्वर्गाला गेले. प्रत्यक्ष भगवान शंकरही या व्रतानेच ब्रह्मकपाला पासून मुक्त झाले मनुष्याला दहा हजार वर्षे तपश्चर्या करून जे फल मिळते तेच पुण्यफल वरूथिनी एकादशी केल्याने मिळते. कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाचे वेळी आठ हजार तोळे सोने दान करून जे फळ मिळते, तेच फळ वरूथिनी एकादशीचे व्रत करणार्‍या मनुष्याला मिळते. जो श्रद्धावान मनुष्य वरूथिनी एकादशीचे व्रत करतो तो त्याला इच्छा असलेले फळ या लोकी व परलोकी मिळवतोच.
राजा, ही एकादशी पवित्र असुन पावन करणारी आहे. ती महापातकांचा नाश करते. आणि व्रतकर्त्याला ऐश्वर्य, भोग व मुक्ती मिळवून देते. राजा, अश्वदानापेक्षा गजदान श्रेष्ठ तर गजदानापेक्षा भुमिदान श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा तिलदान श्रेष्ठ, तिलदानापेक्षा सुवर्णदान श्रेष्ठ व सुवर्णदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान दुसरे झाले नाही व होणार नाही. कारण पितर, देव आणि मनुष्य यांची तृप्ती अन्नदानानेच होत असते. हे श्रेष्ठ राजा, अन्नदानाची बरोबरी कन्यादान करते असे कवी म्हणतात. तसेच कन्यादानाची बरोबरी करणारे गोदान आहे असे स्वतः भगवान विष्णूंनी सांगितले आहे; पण या सर्वप्रकारच्या दानांपेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. वरूथिनी एकादशी केल्याने या विद्यादानाचे फळ मनुष्याला मिळते.
पापामुळे मोह होऊन जे लोक कन्येचे द्रव्य घेतात व त्यावर जगतात ते प्रलयकालपर्यंत नरकात जातात. म्हणून मनुष्याने कधीही कन्येचा मोबदला घेऊ नये. सर्व प्रयत्न करून हे टाळावे. राजा, जो मनुष्य लोभाने कन्याविक्रय करून धन घेतो; तो पुढच्या जन्मात निश्चितपणे मांजर होतो. पण जो मनुष्य कन्या अलंकृत करून कन्यादान करतो त्याला मिळणार्‍या पुण्याचे गणित करणे चित्रगुप्तालाही जमत नाही. असे जे कन्यादानाचे अगणित पुण्य आहे, तेच पुण्य वरूथिनी एकादशीचे व्रत करणार्‍या मनुष्याला मिळते.
काशाच्या भांड्यात भोजन करणे, मांस, मसूरा, चणे, कोद्रू, भाजी, मध, परान्न, दुसर्‍यांदा भोजन व मैथुन या दहा गोष्टी व्रत करणार्‍याने दशमीला वर्ज्य कराव्यात. द्यूतक्रीडा (सोंगट्या खेळणे), झोप, विडा. दंतधावन, दुसर्‍यावर दोषारोप करणे, कपट, पतिताबरोबर भाषण, रागावणे व खोटे बोलणे हे सर्व एकादशीला वर्ज्य करावे.
काशाचे भांडे, मांस, मसुरा, मध, व्यर्थ भाषण, व्यायाम, प्रवास, दुसर्‍यांदा भोजन,मैथुन, हजामत, तेल लावणे आणि परान्न या सर्व गोष्टी द्वादशीला वर्ज्य कराव्यात. राजा, हे सर्व नियम पाळून जो वरूथिनी एकादशीचे व्रत करतो त्याच्या सर्व पातकांचा क्षय ही एकादशी करते व अंती अक्षय मोक्ष मिळवून देते. एकादशीच्या दिवशी जे लोक जागरण करून जनार्दनाची पूजा करतात ते सर्व पापातून मुक्त होऊन परमगती मिळवतात. म्हणून जे लोक पापभीरू आहेत आणि रात्रीचा शत्रू असलेल्या सूर्याचा पुत्र यम याची ज्यांना भिती वाटते त्या सर्व मनुष्यांनी खूप प्रयत्न करून वरूथिनी एकादशीचे व्रत करावे. वरूथिनी एकादशीचे हे माहात्म्य जो वाचेल आणि ऐकेल त्याला हजार गाई दान दिल्याचे पुण्य मिळेल आणि तो सर्व पापांतून मुक्त होऊन शेवटी विष्णुलोकाला जाईल.
॥याप्रमाणे भविष्योत्तर पुराणातील वरूथिनी एकादशीचे माहात्म्य संपूर्ण झाले॥

॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

Sunday, 1 May 2016

दिनविशेष - २ मे २०१६


तिथी
 चैत्र कृष्ण १० (१७:२९) 
वार
 सोमवार     
नक्षत्र
 शततारका (२०:०९)
योग
 ब्रह्मा (११:५५)
करण
 वणिज (६:३१), बव (२८:१८)

घबाड

१७:२९ पर्यंत घबाड योग आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: भरणी
चंद्र नक्षत्र : शततारका
तिथी: १५ + १० = २५
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२४ x ३ = ६९
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता ७ ने भागू  ९७ / ७ = १३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्धयोग

१७:२९ नंतर सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



भद्रा


६:३१ नंतर १७:२९ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Saturday, 30 April 2016

महाराष्ट्र दिन

मे १, इ.स. १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

महाराष्ट्र दिनाची कहाणी


२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ च्या तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगारांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर- सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत प्रचंड जनसमुदाय,एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत,फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.