Sunday, 30 July 2017

दिनविशेष - ३१ जुलै २०१७


तिथी
 श्रावण शुक्ल ८ (०९:४७)
वार
 सोमवार
नक्षत्र
 स्वाती (९:३९)
योग
 शुभ (१४:२८)
करण
बव (०९:४७), बालव (२२:४८)

दुर्गाष्टमी- दुर्गाव्रत

श्रावण शुक्ल अष्टमी दिवशी प्रात:स्नानादी सर्व कृत्ये आटोपून पुन्हा स्नान करावे आणि ओली वस्त्रे धारण करूनच देवीला स्नान घालून, खिरीचा नैवेद्य दाखवावा. आपणही एकवेळ खिरीचेच सेवन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते.
प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

श्रावणी सोमवार

दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.
श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे. गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे. घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे. पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा.-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ

सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

शिवमुष्टि

तीळ.
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.

यमघंट योग

९:३९ नंतर सोमवारी विशाखा नक्षत्र असल्यामुळे यमघंट योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


यमघंट योगावर जन्म झाल्यास बालकाला कष्ट होतात. (शांती केल्यास हे कष्ट नष्ट होतात.)
यमघंट योगावर प्रयाण केले असता मृत्यू
ग्रहप्रवेश केला असता कुलक्षय
देवास्थापाना केली असता मृत्यू हि फळे मिळतात.

याशिवाय
चैत्र शुक्ल पक्ष, शुक्ल ५, गुरुवार व कृत्तिका नक्षत्र असल्यास (भरणी नक्षत्राची ९ घटिका २० पळे संपल्यावर पुढे) देखील यमघंट योग होतो.

नवमी श्राद्ध

अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ९ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment