तिथी
|
श्रावण शुक्ल ९ (११:५४)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
विशाखा (१२:२१)
|
योग
|
शुक्ल (१५:१४)
|
करण
|
कौलव (११:५४), तैतिल (२५:०३)
|
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
जेष्ठ गणितज्ञ
आणि पंचागकर्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले. त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना अभिवादन
करण्यासाठी हा स्मुतीदिन साजरा केला जातो.
श्रावणी मंगळवार
दर
मंगळवारी मंगळागौरी पूजन करावे.
सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे
सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची
पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या
व्रताचे उद्यापन करतात.
सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह शिवासमवेत
असलेल्या गौरीची पूजा करते. पहिल्या वर्षी माहेरी मातृगृही हे व्रत करण्याची प्रथा
आहे. हे व्रत विशेषतः महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात विशेषतः आचरले जाते.
बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी (यांना ‘वसोळ्या’ म्हणतात) एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत
दिवस व रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून सांगता करतात. हे व्रत
सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. ‘जय जय मंगळगौरी’ म्हणून
सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने सुवासिनी स्त्रिया करतात आणि नंतर हातात
तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात. ती कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला
नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले
असताना मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला
अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही
कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन
करतात.
मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व
निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन
करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर
पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा
करतात.पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात.
दशमी श्राद्ध
अपराण्ह काळी दशमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल १० आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व
कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment