Sunday, 9 July 2017

दिनविशेष - १० जुलै २०१७


तिथी
 आषाढ कृष्ण १ (११:२६)
वार
 सोमवार
नक्षत्र
 उत्तराषाढा (१९:०९)
योग
 वैधृति (११:०८)
करण
 कौलव (११:२६), तैतिल (२४:१४)

अशून्यशयनव्रत

शेषशय्येवर असलेल्या श्रीवत्स चिन्हांकित ४ भुजांनी युक्त आणि लक्ष्मीसहित विराजमान झालेल्या नारायणाची पूजा करावी, दिवसभर मौन पाळावे. चंद्रोदयानंतर अर्घ्य देऊन भोजन करावे. या व्रताने घरावरील संकट टळते व अखंड सौभाग्य, सुख मिळते असे भविष्य पुराणात सांगितले आहे. हे व्रत मार्गशीर्षापर्यंत प्रत्येक वद्य द्वितीयेस करावे.

अमृत योग

१९:०९ नंतर सोमवारी श्रावण नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.  
रविवार  हस्त
सोमवार  मृग / श्रवण
मंगळवार  अश्विनी
बुधवार  अनुराधा
गुरुवार  पुष्य
शुक्रवार  रेवती
शनिवार  रोहिणी
हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

मृत्यू योग

१९:०९ पर्यंत सोमवारी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार अनुराधा
सोमवार उत्तराषाढा
मंगळवार शततारका
बुधवार अश्विनी
गुरुवार मृग
शुक्रवार आश्लेषा
शनिवार हस्त
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही 
) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ कृष्ण २ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment