Tuesday, 4 July 2017

दिनविशेष - ५ जुलै २०१७


तिथी
 आषाढ शुक्ल १२ (२६:५२)
वार
 बुधवार
नक्षत्र
 अनुराधा (अहोरात्र)
योग
 साध्य (७:१०)
करण
 बव (१३:४०), बालव (२६:५२)

एकादशी पारणा

१२:११ नंतर शयनी एकादशीचा पारणा करावा.

शाक-गोपद्म व्रतारंभ

स्नान करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्म काढून त्याची पूजा करावी. कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत ४ महिने दररोज हे व्रत करतात.

वामन पूजन

आषाढ शुक्ल द्वादशीला वामनावताराचे यथाविधी पूजन करून व्रत केल्यास यज्ञासमान फळ मिळते. व्रत असे आहे- प्रत्यक्षमूर्ती असेल तर तिच्यासमोर बसावेनसेल तर सोन्याची करून तांब्याच्या संपुष्टात तुलसीपत्रावर स्थापन करावी. तेही शक्य नसेल तर शालिग्रामाच्या मूर्तीची पुरुषसूक्तोक्त मंत्राने षोडशोपचार पूजा करावी

अमृत योग

बुधवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे अमृतसिध्दी योग होत आहे. हा अहोरात्र आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.  
रविवार  हस्त
सोमवार  मृग / श्रवण
मंगळवार  अश्विनी
बुधवार  अनुराधा
गुरुवार  पुष्य
शुक्रवार  रेवती
शनिवार  रोहिणी
हा सामन्यात: सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.

गुरुवार पुष्य
विवाहास वर्ज
शनिवार रोहिणी
प्रयाणास वर्ज
मंगळवार अश्विनी
गृहप्रवेशास वर्ज

रवि पुनर्वसु नक्षत्र प्रवेश

२८:३९ ला रवि पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करत आहे. रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो.
रवि नक्षत्र : पुनर्वसु
चंद्र नक्षत्र: अनुराधा

वाहन: कोल्हा

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
रवि नक्षत्र : पुनर्वसु
चंद्र नक्षत्र: अनुराधा
अंतर : ११
११ ला ९ ने भागले असता बाकी राहते २. म्हणून वाहन कोल्हा आहे. याचाच अर्थ रवि पुनर्वसु नक्षत्रात असताना फारसा पाऊस पडणार नाही.

नक्षत्रसंज्ञा : चंद्र-सूर्य

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
रवि नक्षत्र : पुनर्वसु = चंद्र नक्षत्र
चंद्र नक्षत्र: अनुराधा = सूर्य नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पुनर्वसु नक्षत्रात असताना पाऊस पडेल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री नपुंसक

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारे सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.

रवि नक्षत्र : पुनर्वसु = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र: अनुराधा = नपुंसक नक्षत्र
सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक  आहे त्यामुळे  रवि पुनर्वसु नक्षत्रात असताना वारे सुटून वृष्टी मध्यम होईल.

पावसाचा अंदाज घेताना या बरोबरच रविच्या नक्षत्र प्रवेशाची कुंडली मांडून त्यातील ग्रह स्थिती लक्षात घेणे देखील अत्यावश्यक आहे.

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ आषाढ शुक्ल १२ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment