Saturday, 8 July 2017

दिनविशेष - ९ जुलै २०१७


तिथी
 आषाढ शुक्ल पौर्णिमा (९:३७)
वार
 रविवार
नक्षत्र
 पूर्वाषाढा (१६:४८)
योग
 ऐंद्र (१०:३८)
करण
 बव (९:३७), बालव (२२:३४)

व्यासपूजा / गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमेस 'गुरुपौर्णिमाकिंवा 'व्यासपौर्णिमाअसे म्हणतात. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. व्यास महर्षी हे शंकराचार्यांच्या रुपाने पुन्हा अवतीर्ण झालेअशी भाविकांची श्रद्धा आहे. तेव्हा संन्यासी लोक त्या दिवशी व्यासपूजा म्हणून शंकराचार्यांची पूजा करतात. शिष्यही त्या दिवशी आपल्या गुरुंची पूजा करतात. पूजेचा विधी असा-
स्नानादी नित्यकर्मे आटोपून
गुरुपरंपरासिद्ध्यर्थं व्यासपूजां करिष्ये
असा संकल्प करतात. एक धूत वस्त्र पुढे अंथरुन त्यावर पूर्वेकडून पश्‍चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा गंधाने बारा रेघा काढतात. तेच व्यासपीठ होय. मग ब्रह्मापरापराशक्तीव्यासशुकदेव गौडपादगोविंदस्वामी व शंकराचार्य यांचे त्या व्यासपीठावर आवाहन करुन त्यांची षोडशोपचारे पूजा करतात याच दिवशी दीक्षागुरु व मातापिता यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे.
तामीळ प्रदेशात ही व्यासपूजा ज्येष्ठ पौर्णिमेस करतात. कुंभकोणम व शृंगेरी ही दक्षिण भारतातली शंकराचार्यांची प्रसिद्ध पीठे आहेत. या ठिकाणी व्यासपूजेचा महोत्सव होतो. गुरुपरंपरेत व्यासांना सर्वश्रेष्ठ गुरु मानलेले आहे. ज्ञानाचा उगम व्यासापासून होतोअशी भारतीयांची धारणा आहे.

संन्यासिनां चातुर्मास्यारंभ

या दिवशी संन्यासव्रत घेतलेल्यांचा चातुर्मास आरंभ होतो. व्यासपूजन करून संन्यासी एकाच ठिकाणी दोन महिने वास्तव्य करतात.

वायुघारिणी पौर्णिमा

आषाढ शुक्ल पौर्णिमा दिवशी सूर्यास्ताच्या वेळी गणेशादी देवतांचे पूजन करुन शंखाच्या अग्रभागी तूलिकापुष्प (रुई) लावून उभे धरतात व वार्‍याच्या दिशेवरून शुभाशुभ ठरवतात. अक्षय्य तृतीयेप्रमाणे या दिवशीदेखील धान्यप्रख्यात व्यक्ती यांची तुला करून वेगवेगळ्या पिशव्यांत ठेवतात व दुसरे दिवशी पुन्हा होणार्‍या वजनानुसार तेजामंदी वर्तवितात.

विश्वदेव पूजन

आषाढ पौर्णिमेला जर पूर्वाषाढा नक्षत्र असेल तर दहा विश्‍वदेवांचे पूजन करतात. त्यामुळे ते प्रसन्न होतात.

शिवशयनव्रत

आषाढ पौर्णिमेला भगवान शिव जटाजूट व्यवस्थेच्या विचारात सिंहाच्या कातड्यावर झोपतातम्हणून त्या दिवशी पूर्वविद्धा पौर्णिमा असताना शिवपूजन करून रुद्रव्रत करतात व त्यामुळे शिवलोक प्राप्त होतो.

कालाष्टक

आषाढ कृष्ण प्रतिपदा ते अष्टमीपर्यंत या व्रताचा काळ असतो. या काळात कालभैरवाचे भक्त त्याची पूजा व उपवास करतात आणि आठ ब्राह्मणांना भोजन घालतात.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी जेष्ठ कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment