तिथी
|
भाद्रपद शुक्ल २ (२१:०३)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
पूर्वाफाल्गुनी (१४:०४)
|
योग
|
सिद्ध (२५:४५)
|
करण
|
बालव (९:३५), कौलव (२१:०३)
|
गाजबीज
भाद्रपद शुक्ल
द्वितीयेचे नाव. एक व्रत. उत्तरप्रदेशात पुत्रवती स्त्रिया संततीचे आयुष्य वाढावे, या उद्देशाने हे
व्रत करतात. त्यासाठी भिंतीवर एक चित्र काढतात. त्या चित्रात एका झाडाखाली एक
मुलगा उभा असतो व जवळच्या एका खोपटात एक मुलगा मरून पडलेला असतो. चित्रावर
आकाशातून वीज उतरलेली असते. व्रतीनी स्त्रिया या चित्राची पूजा करतात.
चंद्रदर्शन
अमावास्येला दिसेनासा
झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:२३ ला पश्चिम दिशेला
चंद्र दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहे.
भारतीय भाद्रपद मासारंभ
भारतीय कालगणने नुसार
भद्रपद मास आरंभ होत आहे.
दग्ध योग
२१:०३ नंतर बुधवारी तृतीया
तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल २ आहे त्यांचे
आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी
म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त
मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने
दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना
प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment