Tuesday, 15 August 2017

दिनविशेष - १८ ऑगस्ट २०१७


तिथी
 श्रावण कृष्ण ११ (१०:०२)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 आर्द्रा (२१:०३)
योग
 वज्र (१८:१८)
करण
बालव (१०:०२), कौलव (२०:३९)

अजा एकादशी / कृष्णैकादशी


हे सुप्रसिद्ध व्रत श्रावण कृष्ण एकादशी दिवशी करतात. हिचे 'अजा एकादशी' असे एक नाव आहे. या व्रताने पापाचा नाश होऊन पुनर्जन्मापासून मनुष्य मुक्‍त होतो. प्राचीन काळी राजा हरिश्‍चंद्राने ही एकादशी केल्याची व त्यामुळे त्याची पूर्वस्थिती परत आल्याची कथा आहे.

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळेज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण १२ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.

सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळत्यानंतर ३ मुहूर्त संगव काळत्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळत्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment