Wednesday, 2 May 2018

दिनविशेष - ८ मे २०१८



तिथी
 वैशाख कृष्ण ८ (२०:४३)   
वार
 मंगळवार
नक्षत्र
 श्रवण (७:३८)
योग
 शुक्ल  (१३:४८)
करण
 बालव (७:३९), कौलव (२०:४३)


कालाष्टमी

प्रत्येक महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

धनिष्ठा नवकारंभ

वैशाख कृष्ण पक्षातील धनिष्ठा नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रापर्यंत ९ दिवसाच्या कालावधील धनिष्ठा नवक असे संबोधतात. यालाच महापंचक असेही म्हणतात.  विवाहादी कार्यास हे वर्ज मानले आहे. ७:३८  नंतर धनिष्ठा नक्षत्र सुरु होते. त्यामुळे ७:३८ पासून धनिष्ठा नवकारंभ होतो.

अष्टमी श्राद्ध

अपराण्ह काळी अष्टमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी वैशाख कृष्ण ८ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment