Monday, 14 May 2018

दिनविशेष - १७ मे २०१८


तिथी
 अधिक जेष्ठ शुक्ल २ (११:२७)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 रोहिणी (६:४८), मृग (२८:३३)
योग
 सुकर्मा (१९:०३)
करण
 कौलव (११:२७), तैतिल (२१:५६)


धनिष्ठा नवक समाप्ति

वैशाख कृष्ण पक्षातील धनिष्ठा नक्षत्रापासून रोहिणी नक्षत्रा पर्यंत ९ दिवसाच्या कालावधील धनिष्ठा नवक असे संबोधतात. यालाच महापंचक असेही म्हणतात. ६:४८ ला रोहिणी नक्षत्र आणि म्हणूनच धनिष्ठा नवक समाप्त होत आहे.

मुस्लीम रमजान मासारंभ

मुस्लीम कालगणनेनुसार रमजान मास आरंभ होत आहे.
मुस्लिम दिनदर्शिकेनुसार रमजान-उल मुबारकचा मुकद्दस महिना नववा असतो. प्रत्येक वर्षाच्या या महिन्यात रोजा ठेवला जातो. एक महिन्यापर्यंत सर्व मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. प्रत्येक घरातील लहान थोर मंडळी रोजा करतात.

अशी मान्यता आहे कि, या शुभ महिन्यात स्वर्गाचे दरवाजे उघडले जातात आणि वाईट प्रवृत्तीला कैद केले जाते. दया आणि प्रामाणिकतेची सुरवात या महिन्यापासून होते. त्यामुळे प्रत्येक मुसलमान या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. रमजान हजरत मोहम्मद सल्लल्लाह अलैहवसल्लमच्या उम्मतचा महिना आहे. या महिन्यात रोजे ठेवणार्‍यांना खूप पुण्य मिळते आणि याच दिवसात जो मुसलमान मनापासून खुदा-अल्ला तालाची इबादत आणि कलामपाकची तिलावत करतो त्याची आजपर्यत केलेली सर्व पापं धुतली जातात.

मृत्यू योग

६:४८ नंतर २८:३३ पर्यंत गुरुवारी मृग नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.




संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment