तिथी
|
अधिक जेष्ठ कृष्ण ५ (अहोरात्र)
|
वार
|
रविवार
|
नक्षत्र
|
उत्तराषाढा (११:५९)
|
योग
|
ब्रह्मा (२१:०१)
|
करण
|
कौलव (१७:३६), तैतिल (--:--)
|
सर्वसामान्य दिवस
पंचमी श्राद्ध
अपराण्ह काळी पंचमी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ कृष्ण
५ त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके
१९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू झाला असेल
आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ कृष्ण ५ आहे त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध या
दिवशी करावे.
ज्या महिन्यात
निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक
महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment