Sunday, 13 May 2018

दिनविशेष - १६ मे २०१८


तिथी
 अधिक जेष्ठ शुक्ल १ (१४:२८)   
वार
 बुधवार
नक्षत्र
 कृत्तिका (८:५९)
योग
 अतिगंड (२२:३८)
करण
 बव (१४:२८), बालव (२४:५९)


करिदिन

भावुका अमावास्येचा दुसरा दिवस म्हणून हा करिदिन आहे. ग्रहण दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा दिवस), भावुका अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात. हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ कार्याला वर्ज समजले जातात.

दशहरा आरंभ

जेष्ठ शुक्ल प्रतिपदेपासून दशमी पर्यंत दहा दिवस दशहरा साजरा करतात. गंगास्नान, गंगा पूजन, गंगास्त्रोत्र पठण, दान होम यापैकी शक्य ते करावे. शरीर, वाणी व मन यांचे कडून कळत-नकळत होणारी दहा पापे नष्ट होतात.  

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

चंद्रदर्शन

अमावास्येला दिसेनासा झालेला चंद्र रवीच्या पुढे १२ अंश गेला कि दिसू लागतो. २०:१० ला पश्चिम दिशेला चंद्र दर्शन होईल. सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहे.

मलमासारंभ

या महिन्यात रविचे निरयन राशीसंक्रमण होत नाही.
(मलमास) अधिक मासात श्री पुरुषोत्तम प्रीत्यर्थ  महिनाभर उपोषण, अयाचित, नक्त भोजन अथवा एकभुक्त रहावे. अशक्ताने या चार प्रकारापैकी एक प्रकार निदान तीन दिवस अथवा एक दिवस तरी आचरणात आणावा. महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्ती, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मी प्राप्ती, निदान एक दिवस गंगा स्नान केल्यास सर्व पाप निवृत्ती, मौन भोजन केल्यास पापाचे निरसन होते.
शक्य असेल त्याने मासपर्यंत नित्य अपूपदान (अनारसे) करावे. शक्य नसेल त्याने शुक्ल व कृष्ण द्वादशी , पौर्णिमा, कृष्ण अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावास्या या तिथीस आणि व्यतिपात व वैधृति योग असेल त्या दिवशी अपूपदान करावे. अति अशक्ताने वरील दिवाशिपैकी एका दिवशी अथवा श्रद्धाभक्ती उत्पन्न होईल अशा दिवशी अपूपदान करावे.
अपूपदानाचा संकल्प
पुढील प्रमाणे प्रमाणे संकल्प करून दानवस्तूचे पूजन करावे.
ममत्रयस्त्रिंशद्देवतात्मकविष्णुरुपि सहस्त्रांशु श्रीपुरुषोत्तम प्रीतिद्वारा निखिलपापप्रशमपूर्वकं पुत्रपौत्रयुतधनधान्यक्षेमसमृद्धि लोकद्वय सुख हेतु पृथ्वीदान फ़ल प्राप्त्याऽपूपच्छिद्र समसंख्य वर्ष सहस्त्रावधि स्वर्लोकनिवासादिकल्पोक्त फलसिध्यर्थं मलमासप्रयुक्तं अपूपदानं करिष्ये |
दान देताना पुढील मंत्र म्हणावा
इदं सोपस्कारं त्रयस्त्रिंशदपूपदानं सदक्षिणाकं सतांबूलं पुरुषोत्तम प्रीतिकामस्तुभ्यमहं संप्रददे ||
दान घेणाऱ्याने पुढील मंत्र म्हणून दान घ्यावे.
त्वयादत्तमिदंपात्रंपरमान्नेनपूरितं |
सघृतं प्रीतिगृह्णामि प्रीयतां ते दिवाकर: ||
दानफलं-मंत्रेणानेन यो दद्यात्रयस्त्रिनंशदपूपकान् |
प्राप्नोति विपुलां लक्ष्मीं पुत्रपौत्रादिसंपद: ||
वरील श्लोकारूप मंत्राने जो तेहत्तीस अपूपदान देईल त्याला पुत्रपौत्र व विपुल संपत्ती प्राप्त होईल.

अधिकमासात कोणती कृत्ये करावीत व कोणती कृत्ये वर्ज
नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत. काम्यकर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. जे केल्यावाचून गती नाही अशी कर्मे करावी. ज्वरशांती पर्जन्येष्टी इ. नेहमीची काम्यकर्मे करावीत. देवाची पुन:प्रतिष्ठा करता येते. ग्रहणश्राद्ध, जातकर्म, नामकर्म अन्नप्राशन हे संस्कार करावेत. मन्वादि व युगादि संबंधित श्राद्धादि कृत्ये करावीत. तीर्थश्राद्ध, दर्शश्राद्ध हि करावी.
अपूर्व देवदर्शन, गृहारंभ व वास्तुशांति, संयासग्रहण, नूतनव्रतग्रहणदीक्षा, विवाह, उपनयन, चौल देवप्रतिष्ठा करू नये. 

प्रतिपदा द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा आणि द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी अधिक जेष्ठ शुक्ल १ किंवा अधिक जेष्ठ शुक्ल २ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे. किंवा ज्यांचा गेल्या वर्षी (शके १९३९) जेष्ठ महिन्यात मृत्यू  झाला असेल आणि ज्यांची श्राद्ध तिथी त्यांचे जेष्ठ शुक्ल १ किंवा  जेष्ठ शुक्ल २ त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध या दिवशी करावे.
ज्या महिन्यात निधन झाले असेल तोच महिना अधिक मास येतो तेव्हा प्रथम वर्षश्राद्ध त्या अधिक महिन्यातच करावे. मात्र प्रतिसांवत्सरिक श्राद्ध या निज जेष्ठ महिन्यात करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment