Saturday, 11 August 2018

दिनविशेष - १६ ऑगस्ट २०१८


तिथी
श्रावण शुक्ल ६ (२५:०२)
वार
गुरुवार
नक्षत्र
चित्रा (१५:४८)
योग
शुभ (१६:४९)
करण
कौलव (१३:२१), तैतिल (२५:०२)


श्रियाळ षष्ठी

लोककल्याणकारी औट घटकेचा राजा श्रीयाळशेट याची स्मृती म्हणून आपण शेकडो वर्ष साजरा केला जातो.

सूपोदन-वर्णषष्ठी

पानावर तांदूळ व वाल ठेवून स्त्रियांनी वाण द्यावे. व ते जलाशयात सोडावे.
श्रावण शुक्ल षष्ठीला हे व्रत करतात. व्रतावधी पाच वर्षे. व्रतदिनी शिवमंदिरात जाऊन शिवाची पूजा करावी अगर प्रतिमेची पूजा घरीच करावी. पूजेनंतर शिवाला वरणभाताचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात खारावलेल्या आंब्याचा समावेश असावा. मग हे पदार्थ ब्राह्मणाला दान द्यावेत. उद्यापनाच्या वेळी होमहवन करून त्यात चरू व आंब्यांची पाने यांच्या आहुती द्याव्यात.
फल - अपमृत्यूपासून मुक्‍तत.

कल्की जयंती

पुराणांमध्ये भगवान विष्णुंच्या दहा अवतारांचा उल्लेख आहे. आजवर नऊ अवतार झाले आहेत. दहावा अवतार होणे शेष आहे. धर्मग्रंथांनुसार दहावा अवतार कल्कीचा असेल. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात षष्ठीला हा अवतार पृथ्वीतलावर जन्मास येईल. म्हणूनच या दिवशी कल्की जयंती साजरी करण्याची प्रथा आहे.
र्मग्रंथांमध्ये कल्की अवताराविषयी विस्तृत वर्णन आहे. हा अवतार कलियुग आणि सत्ययुगाच्या संधीकालात होईल. 64 कलांनी युक्त असा हा अवतार असेल. पुराणांमधील उल्लेखानुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात शंभल नामक स्थानी विष्णुयशा नामक तपस्व्याच्या घरी भगवान कल्की यांचा पुत्र रुपात जन्म होईल. कल्की देवदत्त नामक घोड्यावर स्वार होऊन जगातल्या पापी लोकांचा संहार करतील. धर्माची पुनर्स्थापना करतील.
अवतार होण्यापूर्वी पूजा होत असलेला हा एकमेव अवतार आहे. त्यामुळेच कल्कीची अनेक मंदिरे आपल्या देशात आहेत. जयपूरच्या हवा महालासमोर कल्कीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

श्रावणी गुरुवार

दर गुरुवारी बुध-बृहस्पति पूजन करावे.

घबाड

१५:४८ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: आश्लेषा
चंद्र नक्षत्र : चित्रा
तिथी: शुक्ल ६ = ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

दग्ध योग

२५:०२ पर्यंत गुरुवारी षष्ठी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

षष्ठी श्राद्ध

अपराण्ह काळी षष्ठी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण शुक्ल ६ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment