Monday, 20 August 2018

दिनविशेष - २७ ऑगस्ट २०१८



तिथी
श्रावण कृष्ण १ (१९:१५)
वार
सोमवार
नक्षत्र
शततारका (१५:०४)
योग
सुकर्मा (२१:१३)
करण
कौलव (--:--), कौलव (१९:१५)


श्रावणी सोमवार

दर सोमवारी महादेवाचे पूजन करावे.
श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे. गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे. घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे. पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.
मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा.-
ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर ऊँ नमः शिवाय हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात

शिवमुष्टि

मूग
श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ वाहिली जाते.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.
आपल्या शेतात पिकलेलं धान्य देवाला अर्पण करण्याची वृत्ती इथं दिसून येते. शंकराच्या १२ ज्योतीर्लिंग असलेल्या ठिकाणी भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
शिवामूठ वाहताना असे म्हणतात.
शिवा शिवा महादेवा,
माझी शिवामूठ ईश्वरा देवा.
सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा,
नावडती आहे ती आवडती कर रे देवा.


गोकुळ अष्टमी नवरात्र

कित्येक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण-समाजात हे नवरात्र असते. श्रावण कृष्ण प्रतिपदेला सुरू होऊन ते नवमीला पारणे झाल्यावर संपते. या नवरात्रात भागवत सप्ताहाचे विशेष महत्त्व आहे. या अवधीत संपूर्ण भागवत वाचणे, न जमल्यास निदान त्याचा दशम स्कंध तरी वाचतात किंवा श्रवण करतात. याशिवाय अखंड नामसप्ताह, कीर्तन व भंडारा हे कार्यक्रम या दिवसांत असतात. लक्ष्मीनारायण, गोपालकृष्ण, मुरलीधर, विठ्ठल इ. देवांच्या मंदिरात हे नवरात्र साजरे होते. शेवटी गोपालकाला होतो.

धनावाप्ती व्रत

एक काम्य व्रत. श्रावण कृष्ण प्रतिपदेला या व्रताचा प्रारंभ करतात. व्रतावधी एक महिना. विष्णू व संकर्षण यांची निळ्या कमळांनी पूजा करणे, व भाद्रपद पौर्णिमेपूर्वी तीन दिवस उपवास करणे असा याच विधी आहे. उद्यापनाच्या वेळी गोप्रदान करतात.
चैत्र शुद्ध प्रतिपदेला व्रतारंभ करणे, हा याचा दुसरा पर्याय आहे. या पर्यायात विष्णू, पृथ्वी, आकाश व ब्रह्मा यांची अनुक्रमे प्रतिपदा ते चतुर्थी पर्यंत पूजा करतात. व्रतावधी एक वर्ष -
फल - धन, सौंदर्य व सुख यांची प्राप्त

इष्टि

इष्टि म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.

प्रतिपदा श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण १ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment