तिथी
|
श्रावण कृष्ण ११ (१२:१६)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
पुनर्वसु (१५:१४)
|
योग
|
वरीयान (२५:५९)
|
करण
|
बालव (१२:१६), कौलव (२२:४६)
|
अजा एकादशी / कृष्णैकादशी
हे सुप्रसिद्ध व्रत श्रावण
कृष्ण एकादशी दिवशी करतात. हिचे 'अजा एकादशी' असे एक नाव आहे. या
व्रताने पापाचा नाश होऊन पुनर्जन्मापासून मनुष्य मुक्त होतो. प्राचीन काळी राजा
हरिश्चंद्राने ही एकादशी केल्याची व त्यामुळे त्याची पूर्वस्थिती परत आल्याची कथा
आहे.
श्रावणी गुरुवार
दर गुरुवारी
बुध-बृहस्पति पूजन करावे.
गुरुपुष्यामृत
१५:१६ नंतर
सूर्योदयापर्यंतगुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यामुळे सुवर्ण संचयासाठी शुभ मात्र
विवाहास वर्ज असा अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
द्वादशी श्राद्ध
अपराण्ह काळी द्वादशी
तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी श्रावण कृष्ण १२ आहे
त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment