Tuesday, 11 September 2018

दिनविशेष - १८ सप्टेंबर २०१८


तिथी
भाद्रपद शुक्ल ९ (२०:०४)
वार
मंगळवार
नक्षत्र
मूळ (७:३४)
योग
सौभाग्य (२४:२३)
करण
बालव (६:५२), कौलव (२०:०४)


अदु:ख नवमी

'अदु:खनवमी' हे भाद्रपद शुक्ल नवमीचे नाव. विशेषत: स्त्रिया हे व्रत करतात. व्रतावधी नऊ वर्षांचा. व्रतदेवता गौरी असते. उपास, पूजा, जागरण या तीन्ही गोष्टींना या व्रतात महत्त्व आहे. स्त्रिया प्रात:काळी नदीवर स्नान करून मौन धरून घरी येतात. कलशावर पूर्ण पात्रात गौरीची स्थापना करतात. नंतर पूजा, वायनदान, उपोषण शक्य नसल्यास हविष्यान्न भोजन, रात्री नृत्य, गायन, कथाश्रवणादी कार्यांत जागरण; दशमीस देवीची उत्तरपूजा, विसर्जन, दंपतीभोजन व व्रतसंपूर्ती. नऊ वर्षे पूर्ण झाल्यावर उद्यापन. सुवर्णगौरी-प्रतिमेची पूजा व दान. तीळ. घृत. पायस यांचे हवन. नऊ दंपतीस वायन व भोजन.

नंदानवमी

भाद्रपद शुक्ल नवमी दिवशी (नंदानवमी) दुर्गादेवीची यथासांग, यथाविधी पूजा करावी म्हणजे विष्णूलोक प्राप्त होतो. व्रत करणार्‍याने शुक्ल सप्तमीला एकवेळ जेवावे, अष्टमीला उपवास करून दुर्गादेवीला दूर्वांवर स्थापन करून फळाफुलांनी पूजा करावी. रात्री
'ॐ नंदायै नम: स्वाहा हूं फट'
या मंत्राने जप व जागरण करावे. नंतर नवमी दिवशी सकाळी चंडिकादेवीची, गुरूची व कुमारीची पूजा करून भोजन करावे. स्नान व पिण्यासाठी कुशोदकाचा उपयोग करावा. या प्रमाणे शु. ७, ८ व ९मीस चार वर्षेपर्यंत करावे.

नवमी श्राद्ध

अपराण्ह काळी नवमी तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी भाद्रपद शुक्ल ९ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment