Tuesday, 21 July 2015

दिनविशेष - २१ जुलै २०१५


तिथी
 निज आषाढ शु ५ (१५:३१)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 उत्तराफाल्गुनी (२७:११)
योग
 परिघ (२४:३२)
करण
 कौलव (२८:४९)

दग्धयोग

१५:३१ पर्यंत मंगळवारी पंचमी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतिया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

घबाड

२७:११ नंतर घबाड योग होत आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पुष्य
चंद्र नक्षत्र : हस्त
तिथी: ६
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ६
६ x ३ = १८
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे ६ तिथी मिळवू : १८ + ६ = २४
आता ७ ने भागू  २४ / ७ = ३ ३/७
बाकी ३ म्हणून घबाड.

स्कंदषष्ठीव्रत / कोमारकी


हे व्रत पंचमीयुक्त असते. त्या दिवशी उपवास करावा. षष्ठीला स्कंदाची पूजा करावी व एकवेळ जेवावे. ही तिथी कुमार कार्तिकेयासाठी आहे, म्हणून हिला 'कोमारकी' असेही म्हणतात. हे व्रत कार्तिक वद्य षष्ठीलाही करतात.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment