Monday, 20 July 2015

दिनविशेष - २० जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु ४ (१३:००)
वार
 सोमवार
नक्षत्र
 पूर्वाफाल्गुनी (२४:०३)
योग
 वरियान (२३:२६)
करण
 बव (२६:१४)

रवि पुष्य नक्षत्र प्रवेश

रविचे मृग नक्षत्र ते हस्त नक्षत्र संक्रमण हा काळ भारतात पावसाळ्याचा मुख्य काळ समाजाला जातो. १५:५१ ला रवि पुष्य नक्षत्रात प्रवेश करत आहे.
रवि नक्षत्र : पुष्य
चंद्र नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी

वाहन मेंढा

रवि नक्षत्र प्रवेशाच्या वेळी चंद्र कोणत्या नक्षत्रात आहे यावरून वाहन ठरते. सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजावे, त्यास ९ ने भागून बाकी किती राहते त्याप्रमाणे वाहन ठरते.
बाकी
वाहन
पर्जन्य वृष्टीचे स्वरूप
घोडा
पर्वतावर पाऊस पडेल
कोल्हा
पाऊस पडणार नाही.
बेडूक
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
मेंढा
पाऊस पडणार नाही.
मोर
अल्पवृष्टी होईल.
उंदीर
अल्पवृष्टी होईल.
महिष
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
गाढव
अल्पवृष्टी होईल.
० / ९
हत्ती
भरपूर पर्जन्यवृष्टी होईल.
चंद्र नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी
अंतर : ४
याला ९ ने भागले असता बाकी ४ राहील. म्हणून वाहन मेंढा आहे. याचा अर्थ रवि पुष्य नक्षत्रात असताना फारसापाऊस पडणार नाही.

नक्षत्रसंज्ञा :  चं सू

सूर्य नक्षत्रे
रोहिणी, मृग, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, जेष्ठा, मूळ, धनिष्ठा, शततारका, उत्तराभाद्रपदा
चंद्र नक्षत्रे
अश्विनी, भरणी, कृत्तिका, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, पूर्वा भाद्रपदा, रेवती

दोन्ही सूर्य नक्षत्रे
 वारा सुटेल
दोन्ही चंद्र नक्षत्रे
 पाऊस पडणार नाही
एक चंद्र व दुसरे सूर्य
 पाऊस पडेल
चंद्र नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी = सूर्य नक्षत्र
एक चंद्र व दुसरे सूर्य नक्षत्र आहे. याचा अर्थ रवि पुष्य नक्षत्रात असताना पाऊस होईल.

स्त्री-पुरुष-नपुंसक नक्षत्रे : स्त्री स्त्री

स्त्री नक्षत्रे
 आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती
पुरुष नक्षत्रे
 अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा ,उत्तराभाद्रपदा, रेवती
नपुंसक नक्षत्रे
 विशखा, अनुराधा, जेष्ठा

सूर्य नक्षत्र स्त्री संज्ञक व चंद्र नक्षत्र नपुंसक : वारा सुटून वृष्टी मध्यम होईल
स्त्री पुरुष असा योग असेल तर: वृष्टी समाधान कारक होईल.
रवि नक्षत्र : पुष्य = स्त्री नक्षत्र
चंद्र नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी = स्त्री नक्षत्र

दोन्ही स्त्री नक्षत्रे असल्यामुळे रवि पुष्य नक्षत्रात असताना फारशी पर्जन्य वृष्टी होणार नाही.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment