Friday, 24 July 2015

दिनविशेष - २४ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु ८ (२२:२९)
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 चित्रा (०९:०६)
योग
 साध्य (२७:०३)
करण
 विष्टी (०९:३४)

दुर्गाष्टमी

प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

दग्धयोग

२२:२९ पर्यंत शुक्रवारी अष्टमी असल्यामुळे दग्धयोग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतिया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

भद्रा

०९:३४ पर्यंत विष्टी करण म्हणजेच भद्रा आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

महिषाघ्निव्रत


आषाढ शु. अष्टमी दिवशी या व्रताचा उपवास असतो. या दिवशी हळदीच्या पाण्याने स्नान करावे व तशाच पाण्याने महिषघ्निदेवीला स्नान घालावे आणि केशर, चंदन, धूप, कापूर यांनी युक्त पूजा करावी. नैवेद्यात तूप, साखर व गहू यांनी युक्त पदार्थ असावेत. ब्राह्मण व ब्राह्मणकुमारी यांना भोजन देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे सर्व प्रकारची इष्ट सिद्धी प्राप्त होते.

No comments:

Post a Comment