Sunday, 19 July 2015

दिनविशेष - १९ जुलै २०१५

१९ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु ३ (१०:४६)
वार
 रविवार
नक्षत्र
 मघा (२१:०६)
योग
 व्यतिपात (२२:५९)
करण
 वणिज (२३:५०)

विनायक चतुर्थी

या चतुर्थीला 'शयनाख्या चतुर्थी' असे म्हणतात. या दिवशी निद्रित श्रीअनिरुद्धस्वरूप गणेशाची आवडीने पूजा करावी व संन्याशांना भोपळापात्र दान केल्याने मनुष्य़ इच्छित फल प्राप्त करतो. या दिवशी मंगलमूर्ती गणेशाची विधिपूर्वक पूजा केल्याने मनुष्य देवदुर्लभ फळ प्राप्त करतो. या दिवशी मध्याह्नकाळी आंदोळ्यावर भगवान आपल्या सर्व स्त्रियांसह शयन करतात. त्या दिवशी ब्रह्मदेवादी सर्व देवांनी त्यांची पूजा ते निद्रित असतानाच केली. त्यामुळे श्रीगणेश प्रसन्न होऊन त्यांनी या दिवशी कोणी माझी पूजा मला झोपाळ्यावर बसवून करील व मला झोपवील त्याला अक्षय्य सुख-संपत्ती व मुक्ती मी देईन, असा वर दिला आहे.

यमघंट योग

२१:०६ पर्यंत मघा नक्षत्र आहे. रविवारी मघा नक्षत्र आल्यामुळे हा योग झाला आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – मघा
सोमवार – विशाखा
मंगळवार – आर्द्रा
बुधवार – मूळ
गुरुवार – कृत्तिका
शुक्रवार – रोहिणी
शनिवार – हस्त


भद्रा


२३:५० नंतर विष्टी करण म्हणजेच भद्रा आहे. प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते. विष्टीला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत.  शुभ कार्यासाठी हा काल निंद्य मानला आहे.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment