Tuesday, 28 July 2015

दिनविशेष - २८ जुलै २०१५

तिथी
 निज आषाढ शु १२ (२३:०८)
वार
 मंगळवार
नक्षत्र
 जेष्ठा (१३:५२)
योग
 ऐन्द्र (२३:२२)
करण
 बव (११:४५)

शाक-गोपद्म व्रतारंभ

स्नान करून देवघरात किंवा तुळशीपुढे ३३ गोपद्म काढून त्याची पूजा करावी. कार्तिक शुल्क एकादशीपर्यंत ४ महिने दररोज हे व्रत करतात.

वामन पूजन

आषाढ शु. द्वादशीला वामनावताराचे यथाविधी पूजन करून व्रत केल्यास यज्ञासमान फळ मिळते. व्रत असे आहे- प्रत्यक्षमूर्ती असेल तर तिच्यासमोर बसावे; नसेल तर सोन्याची करून तांब्याच्या संपुष्टात तुलसीपत्रावर स्थापन करावी. तेही शक्य नसेल तर शालिग्रामाच्या मूर्तीची पुरुषसूक्तोक्त मंत्राने षोडशोपचार पूजा करावी

घबाड

१३:५२ पर्यंत घबाड योग होत आहे. हा शुभ योग आहे.
सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने गुणून त्यात शुक्र प्रतिपदेपासून च्या तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य नक्षत्र: पुष्य
चंद्र नक्षत्र : जेष्ठा
तिथी: १२
सूर्य नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = ११
११ x ३ = ३३
यात शुक्ल प्रतिपदेपासूनच्या  म्हणजे १२ तिथी मिळवू : ३३ + १२ = ४५
आता ७ ने भागू  ४५ / ७ = ६ ३/७

बाकी ३ म्हणून घबाड.

संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment