तिथी
|
चैत्र शुक्ल २ (१७:५३)
|
वार
|
सोमवार
|
नक्षत्र
|
रेवती (२०:०८)
|
योग
|
ब्रह्मा (१७:३९)
|
करण
|
कौलव(१७:५३), तैतिल (२९:२५)
|
ईश्वर गण गौरीव्रत, शंकरपार्वतीस दवणा वाहणे
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून चैत्र
वद्य तृतीयेपर्यंत रोज शिवगौरी यांची पूजा करणे, हा या व्रताचा विधी आहे.
हे व्रत फक्त सुवासिनींसाठीच सांगितलेले आहे.
फल-सौभग्यप्राप्ती.
उमादी पूजा
हे एक तिथिव्रतआहे. चैत्र शुक्ल द्वितीयेस हे व्रत करतात. या व्रतास उमा, शिव व अग्नी यांची पूजा करावयाची असते.
नेत्रव्रत
हे व्रतसुद्धा चैत्र शुक्ल
द्वितीयेला करतात. ह्यासाठी सूर्यचंद्रस्वरूपी आश्विनकुमाराची मूर्ती बनवून तिचे गंधपुष्पादी
साहित्याने पूजन करतात.
या व्रतात ब्रह्मचर्याचे पालन करावे. ब्राह्मणांना सुवर्ण-रजताची
दक्षिणा द्यावी आणि गाईच्या दह्यात गाईचे तूप मिसळून भोजन करावे. हे व्रत १२
वर्षापर्यंत करतात. हे व्रत केल्याने दृष्टी सुधारते आणि चेहरा अधिक कांतिमान होतो.
मुस्लीम रज्जब मासारंभ
मुस्लीम कालगणनेनुसार रब्बज महिना आरंभ होत
आहे.
द्वितीया श्राद्ध
अपराण्ह काळी द्वितीया तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी चैत्र
शुक्ल २ आहे त्यांचे आजच्या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह
काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या
काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना
सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३
मुहूर्त सायंकाळ असतो.
अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी
सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त
मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment