Thursday, 29 March 2018

विषुवदिन



पृथ्वीवरील सर्व ठिकाणी  २१ मार्च आणि २२ सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास समान असतात. या स्थितीला "विषुवदिन' असे म्हटले जाते. इंग्रजीमध्ये या दिवसाला Spring Equinox (स्प्रिंग इक्विनॉक्‍स) असे म्हटले जाते. "इक्विनॉक्‍स' हा लॅटिन शब्द असून याचा अर्थ समान तासाची रात्र असा होतो.
·         प्रतिवर्षी २१ मार्च आणि २२ सप्टेंबर असे दोन विषुवदिन असतात
·         या दोनही दिवशी सूर्य किरणे थेट विषुववृत्तावर पडतात.
·         या दिवशी जगात सर्व ठिकाणी दिवस आणि रात्रीचे तास समान असतात. विषुववृत्तावर नेहमीच अशी स्थिती असते.
·         या दिवसापासून दक्षिण आणि उत्तर गोलार्धात यामुळे दोन वेगवेगळे ऋतू सुरू होतात.
·         मार्च महिन्यामधील विषुवदिनाला उत्तर गोलार्धात "Vernal (Spring) equinox  म्हणतात तर यालाच दक्षिण गोलार्धात Autumnal equinox ऑटोमनल (Fall) equinox असे म्हटले जाते.
·         सप्टेंबर महिन्यामधील विषुवदिनाला उत्तर गोलार्धात Autumnal equinox ऑटोमनल (Fall) equinox म्हणतात तर यालाच दक्षिण गोलार्धात "Vernal (Spring) equinox  असे म्हटले जाते.
·         पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या अक्षास (आस) काटकोन करून असलेले आणि उत्तर व दक्षिण ध्रुवापासून समान अंतरावर असणारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील काल्पनिक महावर्तुळ म्हणजेच विषुववृत्त. विषुववृत्त हे शून्य अंश अक्षवृत्त आहे. त्या अक्षामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण गोलार्ध असे विभाजन होते.
·         विषुववृत्तावरील ठिकाणांवर सर्वांत जलद सूर्योदय आणि सूर्यास्त होतो.
·         विषुववृत्तावर नेहमी बारा तास दिवस तर बारा तास रात्र अनुभवास येते. पृथ्वीवरील इतर ठिकाणी मात्र दिवस रात्र ऋतुमानानुसार लहान अथवा मोठ्या होतात.
·         अवकाशयाने सोडण्यासाठी विषुववृत्तावरील ठिकाणांचा वापर केला जातो. कारण पृथ्वीच्या परिवलनामुळे (स्वत: भोवती फिरण्याची गती) विषुववृत्तावरील ठिकाणे इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा पृथ्वीच्या मध्याभोवती जास्त वेगाने फिरत असतात. या अधिक वेगामुळे अवकाशयाने सोडण्यासाठी कमी इंधन लागते. (. फ्रेंच गयानामधील कोऊरु येथील गयाना स्पेस सेंटर.)

जगातील तेरा देशांमधून विषुववृत्तीय रेषा जाते. त्यांची नावे पुढील प्रमाणे
१)      इक्वेडोर
२)      कोलंबिया
३)      ब्राझील
४)      गॅबॉन
५)      कॉंगो
६)      डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉन्गो
७)      युगांडा
८)      केनिया
९)      सोमालिया
१०)  मालदीव
११)  इंडोनेशिया
१२)  करबत्ती
१३)  साओ टोमे आणि प्रिन्सिपल


No comments:

Post a Comment