तिथी
|
कार्तिक शुक्ल १३ (२७:०२)
|
वार
|
शनिवार
|
नक्षत्र
|
रेवती (२२:३०)
|
योग
|
वज्र (१२:३१)
|
करण
|
कौलव (१६:४६)
|
शनि प्रदोष
सूर्यास्तानंतर
पुढे ३ मुहूर्त (म्हणजे मध्यम मानाने
साधारण २ तास २४ मिनिटे ) प्रदोष काळ असतो.
प्रत्येक
चांद्र मासात प्रदोष काळी जेव्हा त्रयोदशी असेल त्या दिवशी प्रदोष निमित्त उपास
करतात.
‘कामनाभेद ' हा या व्रताचा विशेष
आहे. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध व वद्य त्रयोदशीला हे व्रत करावे. याप्रमाणे एक
वर्षभर करावे. व्रतादिवशी प्रात: स्नान करुन
'मम पुत्रादिप्राप्तिकामनया
प्रदोषव्रतमहं करिष्ये'
इ. संकल्प करून व्रतारंभ करावा. सायंकाळी पुन्हा स्नान करावे. श्रीशंकराचे
पुढे बसून वेदपाठी ब्राह्मणाज्ञेप्रमाणे पुढील मंत्राने प्रार्थना करावी व
षोड्शोपचारे पूजा करावी.
भवाय भवनाशाय महादेवाय धीमते । रुद्राय नीलकंठाय शर्वाय शशिमौलिन ॥
उग्रायोग्राघनाशाय भीमाय भवहारिणे । ईशानाय नमस्तुभ्यं पशूनां पतये नमः ॥
भाजलेले सातूचे पीठ , तूप व साखरेचा नैवेद्य अर्पण
करावा. याप्रमाणे करून तेथेच आठ दिशांना आठ दिवे प्रज्वलित करावेत व प्रत्येक दिवा
लावताना आठ वेळा नमस्कार करावा.
'धर्मस्त्वं वृष रूपेण
जगदानन्दकारक।
अष्टमूर्तैरधिष्ठानं अथः पाहि सनातन ।'
या मंत्राने नंदिकेश्वराला पाणी दुर्वा आदि देऊन त्याची पूजा करावी व त्याला
स्पर्श करुन पुढील मंत्राने शंकर, पार्वती आणि नंदिकेश्वराची
प्रार्थना करावी.
ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्ये चापम्रुत्यव: !
भय क्लेश मनस्ताप: नश्यनंतु मम सर्वदा !!
"
( कर्ज,रोग,गरिबी,अपम्रूतू,भय, त्रास ईत्यादि मनस्ताप माझे कायमचे नाहिशे होवोत.)
हे व्रत विशेषत: स्त्रियांनी करण्याचे आहे. नंदीच्या शेपूट व शिंगे आदींच्या
स्पर्शाने अभीष्टसिद्धी होते.
Ø सोमवार: शांतीरक्षणासाठी सोम प्रदोष करावा.
Ø मंगळवार: ऋणमुक्त होण्यासाठी
भौम प्रदोष करावा.
Ø शुक्रवार: सौभाग्य किंवा
स्त्री-समृद्धीची इच्छा असेल तर शुक्रवारी हे व्रत करावे.
Ø शनिवार: पुत्र प्राप्तीसाठी
शनिप्रदोष वर्षभर किंवा फलप्राप्ती होई पर्यंत करावा.
Ø रविवार: आयुर्दायासाठी
अर्कप्रदोष हे व्रत करावे.
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास
मध्यरात्री विष्णूपूजन करून
अरुणोदयी शिवपूजन करावे.
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास आदले दिवशी करावा. कारण हेमलंब नामक संवत्सरी
कार्तिकी शु. चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णूनीच मणिमर्णिका घाटावर आंघोळ
करून श्रीशिवांचे पूजन केले होते.
यासाठी विष्णुपूजेला रात्रिव्यापिनी व शिवपूजेला अरुणोदयव्यापिनी तिथी असावी.
आवळीभोजन
आवळीचे झाडाखाली विष्णूपूजन
करावे
कार्तिक शुद्ध दशमीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी आवळीच्या झाडाखाली
स्वयंपाक करून इष्टमित्रांसह भोजन करतात. पूजाविधी आवळीपूजनाप्रमाणेच असतो.
महाराष्ट्रात व कर्नाटकात देवस्थान असेल त्या ठिकाणची देवाची मूर्ती पालखीत बसवून
आवळीच्या झाडाखाली आणतात. मग देवाला तेथे महानैवेद्य करून भोजन झाल्यावर सायंकाळी
देव मिरवणुकीने देवळात परत नेतात.
घबाड
२२:३० नंतर २७:०२ पर्यंत घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: विशाखा
चंद्र
नक्षत्र : अश्विनी
तिथी: १३
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = १३
१३
x ३ = ३९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे १३ तिथी मिळवू : ३९ + १३ = ५२
आता
७ ने भागू ५२ / ७ = ७ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment