Sunday, 13 November 2016

दिनविशेष - १५ नोव्हेंबर – २०१६



तिथी
 कार्तिक कृष्ण १ (१५:२६)  
वार
 मंगळवार
नक्षत्र
 कृत्तिका (१३:१७)
योग
 परिघ (१९:१४)
करण
 तैतिल (२५:३२)


महालय समाप्ति

भाद्रपद वद्य प्रतिपदेला सुरु झालेला महालय सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेपर्यंत असतो. रवी वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्यामुळे महालयाची समाप्ती होत आहे.

रविचा वृश्चिक राशीत प्रवेश

३०:१७ ला रवि वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे.
रवि संक्रमणाच्या वेळी,  वृश्चिक राशीसाठी संक्रमणापूर्वी पूर्वी १६ घटिका पुण्यकाळ असतो. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १६ तारखेला सुर्योदयापासून १२:२३ असा आहे.
सामुदायिक मुहूर्त ४५ म्हणजे समर्घ आहेत. रविच्या राशी संक्रमाणाच्या वेळी असणाऱ्या चंद्र नक्षत्रावरून ३ प्रकारचे सामुदायिक मुहूर्त होतात. ते व त्यांची फळे पुढील प्रमाणे:
·         १५ : महर्घ / जघन्य : फळ = तेजी
·         ३० : साम्यार्घ : फळ = सम
·         ४५ : समर्घ : फळ = मंदी


इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment