तिथी
|
कार्तिक शुक्ल ८ (१३:२१)
|
वार
|
मंगळवार
|
नक्षत्र
|
धनिष्ठा (२८:३७)
|
योग
|
वृद्धि (२३:४६)
|
करण
|
बालव (२५:०९)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
गोपाष्टमी
गाईचे पूजन व प्रदक्षिणा,
गाईचे मागून चालावे.
या दिवशी पहाटे
गाईंना आंघोळ घालावी. गंधफुलांनी त्यांची पूजा करावी व वस्त्रालंकारांनी त्यांना
सजवावे. शिवाय गोपाळां (गुराख्यां) चे पूजन करून गाईंना गोग्रास द्यावा.
प्रदक्षिणा घालावी व गाईंच्या मागून थोडा काळा चालत जावे. असे केल्याने इच्छित फळ
मिळते. याच दिवशी सायंकाळी गाई चरून येताच त्यांना नमस्कार करून, त्यांची पंचोपचार पूजा करावी. त्यांना पंचपक्वान्ने खावयास
घालून त्यांची पायधूळ मस्तकी धारण करावी. यायोगे सौभाग्यवृद्धी होते.
मृत्यूयोग
२८:३७ नंतर
मंगळवारी शततारका नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोगहोत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील
स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment