Thursday, 29 November 2018

दिनविशेष - ३ डिसेंबर २०१८


तिथी
कार्तिक कृष्ण ११ (१३:००)
वार
सोमवार
नक्षत्र
चित्रा (२६:४९)
योग
सौभाग्य (२५:२२)
करण
बालव (१३:००), कौलव (२४:३७)

उत्पत्ति एकादशी  / कृष्णैकादशी

कार्तिक कृष्ण एकदशीला 'उत्पत्ति एकादशी' असेही म्हणतात. प्रात:स्नानादी नित्य कर्मे झाल्यावर
'ममाखिल पापक्षयपूर्वक श्रीपरमेश्‍वरप्रीतिकामनया कार्तिक कृष्णैकादशीव्रतं करिष्ये ।'
असा संकल्प करून उपोषण करावे. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणेच तिथीचा निर्णय घ्यावा व व्रताचे नियम पाळावे.

कामधेनुव्रत

व्रतावधी कार्तिक कृष्ण एकादशीपासून पाच दिवस. याच्या देवता श्री व विष्णू या आहेत. घर, गोठा, चैत्य, देवालय, रस्त्ता, स्मशानभूमी व तलाव या ठिकाणी दिवे लावणे, रात्री फाशांनी खेळणे, एकादशीस उपवास करून विष्णुमूर्तीला गाईच्या दुधाने किंवा तुपाने स्नान घालणे, असा याचा विधी आहे.
फल - सर्व पापांची निष्कृती.

दग्ध योग

१३:०० पर्यंत सोमवारी एकादशी तिथी असल्यामुळे दग्धयोग होत आहे.
तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी

द्वादशी श्राद्ध

अपराण्ह काळी द्वादशी तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक कृष्ण १२ असेल तर या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment