तिथी
|
कार्तिक शुक्ल ७ (अहोरात्र)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
श्रवण (अहोरात्र)
|
योग
|
गंड (१६:३९)
|
करण
|
गरज (१७:४३), वणिज (--:--)
|
शाक सप्तमी
कार्तिक शुक्ल सप्तमीस शक्य
त्या भाजीपाल्याचे दान करून रात्री स्वत:ही शाकान्नच घ्यावे आणि नंतर प्रत्येक
शुक्ल सप्तमीला एक वर्षपर्यंत हेच व्रत करीत राहावे. त्यायोगे संपूर्ण रोगापासून
मुक्ती मिळते.
कल्पादि
ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि
असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)
चैत्र - शुक्ल ५,
२)
चैत्र – कृष्ण ५
३)
वैशाख – शुक्ल ३
४)
कार्तिक - शुक्ल ७
५)
मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)
माघ – शुक्ल १३
७)
फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र
कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.
सप्तमी श्राद्ध
अपराण्ह काळी सप्तमी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल ७ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३
मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment