तिथी
|
कार्तिक शुक्ल १३ (१४:०७)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
अश्विनी (१८:३१)
|
योग
|
व्यतीपात (१५:४१)ज्र (१८:२९)
|
करण
|
तैतिल (१४:०७), गरज (२५:३५)
|
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास
मध्यरात्री विष्णूपूजन करून
अरुणोदयी शिवपूजन करावे.
वैकुंठ चतुर्दशीचा उपवास आदले दिवशी करावा. कारण हेमलंब नामक संवत्सरी
कार्तिकी शु. चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णूनीच मणिमर्णिका घाटावर आंघोळ करून
श्रीशिवांचे पूजन केले होते.
यासाठी विष्णुपूजेला रात्रिव्यापिनी व शिवपूजेला अरुणोदयव्यापिनी तिथी असावी.
आवळीभोजन
आवळीचे झाडाखाली विष्णूपूजन
करावे
कार्तिक शुद्ध दशमीपासून
पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी आवळीच्या झाडाखाली स्वयंपाक करून इष्टमित्रांसह भोजन
करतात. पूजाविधी आवळीपूजनाप्रमाणेच असतो. महाराष्ट्रात व कर्नाटकात देवस्थान असेल
त्या ठिकाणची देवाची मूर्ती पालखीत बसवून आवळीच्या झाडाखाली आणतात. मग देवाला तेथे
महानैवेद्य करून भोजन झाल्यावर सायंकाळी देव मिरवणुकीने देवळात परत नेतात.
मृत्यू योग
१८:३१ पर्यंत बुधवारी
अश्विनी नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा
योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
|
सोमवार – उत्तराषाढा
|
मंगळवार – शततारका
|
बुधवार – अश्विनी
|
गुरुवार – मृग
|
शुक्रवार – आश्लेषा
|
शनिवार – हस्त
|
हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो.
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष
रहात नाही.
चतुर्दशी श्राद्ध
अपराण्ह काळी चतुर्दशी
तिथी असल्यामुळे, श्राद्धतिथी कार्तिक शुक्ल १४ असेल तर या दिवशी
श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये
अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राध्दतिथि अपराण्हकाळी म्हणजे सामान्यतः दुपारी
दीड ते चार ह्या काळात ज्या दिवशी जास्त मानाने असेल त्या दिवशी सकाळी
श्राध्दतिथि नसताना सुध्दा सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत कोणत्याही वेळी
श्राध्दकर्म करता येते.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ प्रशस्त मानवा.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment