Sunday, 23 August 2015

दिनविशेष - २३ ऑगस्ट २०१५

तिथी
 श्रावण शु ८ (१३:२७)
वार
 रविवार
नक्षत्र
 अनुराधा (२२:३६)
योग
 ऐंद्र (११:४४)
करण
 बालव (२५:४०)

दुर्गाष्टमी - दुर्गाव्रत

श्रावण शु. अष्टमी दिवशी प्रात:स्नानादी सर्व कृत्ये आटोपून पुन्हा स्नान करावे आणि ओली वस्त्रे धारण करूनच देवीला स्नान घालून, खिरीचा नैवेद्य दाखवावा. आपणही एकवेळ खिरीचेच सेवन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते.
प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.

भारतीय भाद्रपद मासारंभ

भारतीय काल गणनेनुसार भाद्रपद मास आरंभ होत आहे.

कान्यायन

रविचा १६:०७ वाजता सायन कन्या राशीत प्रवेश होत आहे.

सौर शरदऋतु प्रारंभ

भारतीय काल गणनेनुसार शरद ऋतु आरंभ होत आहे.

मृत्यूयोग

२२:३६ पर्यंत रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. सर्व शुभ कार्यासाठी हा योग वर्ज सांगितला आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त



श्रावणी रविवार


दर रविवारी गभस्ति सूर्याचे मौनाने पूजन करावे.

संदर्भ
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

1 comment: