Saturday, 31 December 2016

दिनविशेष - २ जानेवारी – २०१७



तिथी
 पौष शुक्ल ४ (१५:५१)   
वार
 सोमवार
नक्षत्र
 धनिष्ठा (१६:५१)
योग
 वज्र (८:३३)
करण
 बव (२७:५०)


विनायक चतुर्थी

या चतुर्थीस 'कामदा' असे अभिधान आहे. या दिवशी सर्व देवांनी अनुष्ठाने करून गणेशास प्रसन्न करून घेतले. त्यांच्या मनोकामना परिपूर्ण झाल्या व मदनाला जगात विविध रूपात राहण्यास जागा देऊन रतीला सौभाग्यदान केले. म्हणून या चतुर्थीस ' कामदा' म्हणतात. या दिवशी विघ्नेश्‍वर गणेशाची पूजा, प्रार्थना करुन एका ब्राह्मणास लाडवाचे भोजन व दक्षिणा द्यावी. हे व्रत विधिपूर्वक करण्यास धन-संपत्तीचा अभाव राहत नाही.

भद्रा

१५:५१ पर्यंत भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष मानू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

दिनविशेष - १ जानेवारी – २०१७

💫💥इसवी सन आरंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !💥💫


तिथी
 पौष शुक्ल ३ (१५:३४)   
वार
 रविवार
नक्षत्र
 श्रवण (१६:०१)
योग
 हर्षण (९:२६)
करण
 वणिज (२७:४५)


इसवीसन २०१७ आरंभ

इसवी सन २०१६ चा प्रारंभ होत आहे. संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचे स्वागत उत्साहाने केले जाते.

भद्रा

२७:४५ नंतर भद्रा म्हणजेच विष्टि करण आहे.

उत्पत्ति कथा:
देव आणि दानव युद्धाच्या वेळी भागान शंकर अतिशय क्रुद्ध झाले आणि त्यांनी दैत्याचा संहार करण्यासाठी आपल्या देहातून भद्रा नावाची राक्षसी निर्माण केली. हिला भद्रा, कल्याणी अशी नावे आहेत. हिचे स्वरूप अमंगळ असून ही गर्दभमुखी, पुच्छवती, सप्तभुजा, सिंहासारखा गळा असलेली, कृशोदरी, प्रेतावर आरूढ झालेली व दैत्यांचा संहार करणारी असून दवांनी आपल्या कर्णप्रांती ठेवलेली आहे.

प्रत्येक चांद्रमासात ८ वेळा भद्रा येते.शुक्ल पक्षात चतुर्थीचा व एकादशीचा उत्तरार्ध, अष्टमीचा व पौर्णिमेचा पूर्वार्ध तर कृष्ण पक्षात तृतीया व दशमीचा उत्तरार्ध व सप्तमी आणि चतुर्दशीचा पूर्वार्ध असे दोन्ही पक्षात चर चर वेळा भद्रा येते.

भद्रा निवास:
कर्क, सिंह, कुंभ व मीन राशीत चंद्र असताना येणारी भद्रा मृत्यूलोकी असते.
मेष, वृषभ, मिथुन व वृश्चिक राशीत चंद्र असता येणारी भद्रा स्वर्गलोकी असते.
कन्या, तूळ, धनु व मकर राशीत चंद्र असता येणारी भद्रा पाताळलोकी असते.
भद्रा निवास जेथे असेक तेथेच त्याचे फळ मिळते. अर्थात केवळ मृत्यूलोकी म्हणजे पृथ्वीवर भद्रा असता ती अशुभ जाणावी.

अपवाद:
पुर्वार्धी असलेली भद्रा रात्री असल्यास तसेच उत्तरार्धी असलेली भद्रा दिवसा असल्यास भद्रा दोष माणू नये.

योग्य व वर्ज कार्ये:
वध, बंधन, विषप्रयोग, अग्निप्रयोग, अस्त्रप्रयोग, तोडणे, उच्चाटन, जारणमारणादि कृत्ये व घोडे, रेडे, उंट इत्यादि संबंधित कार्ये विष्टीमध्ये केल्यास सिद्धीस जातात.
श्रावणी, फाल्गुनी इ. कार्ये भद्रा मृत्युलोकी असताना करू नये. असे केल्यास श्रावणीमुळे राजहानी व फाल्गुनीमुळे अग्निभय होण्याची शक्यता असते.

भद्रा मुख व पृच्छ:
ज्या तिथीत भद्रा असेल त्या आरंभापासून विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे मुख असते. ते अत्यंत अशुभ होय. तसेच विशिष्ट प्रहरातील काही घटिका भद्रेचे पुच्छ असते. हे निर्दोष मानले असून सर्व कार्यास प्रशस्त मानावे.


संदर्भ :*
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

Friday, 30 December 2016

दिनविशेष - ३१ डिसेंबर – २०१६



तिथी
 पौष शुक्ल २ (१४:५२)   
वार
 शनिवार
नक्षत्र
 उत्तराषाढा (१४:४८)
योग
 व्याघात (१०:०१)
करण
 तैतिल (२७:१६)


आरोग्यव्रत किंवा आरोग्य द्वितीया

पौष शुक्ल द्वितीये दिवशी गो-शृंगोदका (गाईची शिंगे धुऊन घेतलेले पाणी) - ने स्नान करावे. श्‍वेतवस्त्रे परिधान करावीत. सूर्यास्तानंतर बालेंदू म्हणजे द्वितीयेच्या चंद्राची पूजा करावी. जोपर्यंत त्याचा अस्त होत नाही ,तोपर्यंत गूळ, दही, परमान्न (खीर) आणि मीठ यांचे दान द्यावे. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर केवळ गाईच्या दुधाचे ताक प्राशन करून भूमिशयन करावे. याप्रमाणे प्रत्येक शुक्ल द्वितीयेला एक वर्षपर्यंत चंद्रपूजन व भोजनादी व्रत करावे व बाराव्या महिन्यात (मार्गशीर्ष) ला बालेंदुची यथासांग पूजा करावी आणि घागर भरुन उसाचा रस, सोने व वस्त्र ब्राह्मणाला दान देऊन मग स्वतः जेवावे. यायोगे रोगनिवृत्ती होऊन आरोग्यवृद्धी होते. सर्वप्रकारची सुखे प्राप्त होतात.
या दिवशी गुरुवार असेल, तर प्रातःस्नान झाल्यावर यथाविधी ब्रह्मदेवाची पूजा करून नक्तव्रत करावे. यायोगे उत्तम संपत्ती प्राप्त होते. यालाच विधिपूजा म्हणतात. हे व्रत ब्रह्मपुरात सांगितले आहे.


मुस्लीम रबिलाखर मासारंभ

मुस्लीम काल गणनेनुसार रबिलाखर मास आरंभ होत आहे.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट