Wednesday, 7 December 2016

दिनविशेष - ८ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष शुक्ल ९ (२४:३७)   
वार
 गुरुवार
नक्षत्र
 पूर्वाभाद्रपदा (११:१७)
योग
 सिद्धि (२३:२५)
करण
 बालव (१३:२६)


नंदिनी नवमी

मार्गशीर्ष शुक्ल नवमीला 'नंदिनी नवमी' असे म्हणतात. या दिवसापासून तीन रात्रीपर्यंत देवीची यथासांग पूजा करावी, म्हणजे अश्‍वमेध यज्ञाचे फळ मिळ्ते.

कल्पादि

ब्रह्मदेवाच्या  दिवसाच्या आरंभाची जी तिथी असते तिला कल्पादि असे म्हणतात. पुढील सात तिथी कल्पादि आहेत.
१)      चैत्र - शुक्ल ५,
२)      चैत्र – कृष्ण ५
३)      वैशाख – शुक्ल ३
४)      कार्तिक - शुक्ल ७
५)      मार्गशीर्ष – शुक्ल ९
६)      माघ – शुक्ल १३
७)      फाल्गुन – शुक्ल ३
धर्मसिंधु ग्रंथात चैत्र कृष्ण ५ न सांगता चैत्र शुक्ल प्रतिपदा सांगितली आहे.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment