Saturday, 24 December 2016

दिनविशेष - २५ डिसेंबर – २०१६



तिथी
 मार्गशीर्ष कृष्ण १२ (३०:०७)   
वार
 रविवार
नक्षत्र
 विशाखा (२७:३७)
योग
 सुकर्मा (८:०६)
करण
 कौलव (१६:५१)


उभयद्वादशी

हे एक तिथिव्रत आहे. व्रतारंभ मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला होतो. दर द्वादशीला विष्णूच्या केशव, नारायणादी एकेका रूपाची पूजा करतात. याप्रमाणे वर्षभरात चोवीस रूपांची पूजा होते.

भृगूव्रत

हे तिथिव्रत आहे. मार्गशीर्ष कृष्ण द्वादशीला हे व्रत आरंभतात. व्रतावधी एक वर्ष. भृगू नावाच्या बारा देवांची पूजा आणि हवन हा यातील मुख्य विधी आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण द्वादशीला हे व्रत करावयाचे असते. उद्यापनाच्या वेळी गाय दान देतात.

सुरूप द्वादशी

मार्गशीर्ष कृष्ण पुष्पयुक्त द्वादशीच्या आदल्या दिवशी रात्री जितेन्द्रिय राहून विष्णूचे ध्यान करावे आणि श्‍वेत धेनूच्या शेणाच्या गोव‍र्‍या पेटवून त्या अग्नीत घृतादियुक्त तिळाच्या १०८ आहुती देऊन हवन करावे. दुसरे दिवशी नदी, तलाव आदी जलाशयावर स्नान करुन भगवंताच्या सोन्याच्या प्रतिमेची तिळाच्या पात्रात ठेवून पूजा करावी. तीळ, फळे यांचा नैवेद्य दाखवावा. नंतर
'नमः परमशान्ताय विरूपाक्ष नमोस्तुते'
या मंत्राने अर्घ्य द्यावा. ब्राह्मणभोजन घालून ती मूर्ती त्यास दान द्यावी.

तिथिवासर

१०:११ पर्यंत तिथीवासर आहे. द्वादशीच्या प्रथम पादाला हरीवासर असे म्हणतात. वैष्णवांनी या काळात भोजन करू नये.


ख्रिसमस / नाताळ

नाताळ हा मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन देवता येशू ख्रिस्त याच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जाणारा सण आहे. काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो
भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.


दग्ध योग

३०:०७ पर्यंत रविवारी द्वादशी असल्यामुळे दग्ध योग होत आहे. तिथी आणि वार यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार द्वादशी
सोमवार एकादशी
मंगळवार पंचमी
बुधवार - तृतीया
गुरुवार षष्ठी
शुक्रवार अष्टमी
शनिवार नवमी



मृत्यू योग

२७:३७ नंतर रविवारी अनुराधा नक्षत्र असल्यामुळे मृत्यूयोग होत आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.



संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment