तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ९ (२२:२५)
|
वार
|
गुरुवार
|
नक्षत्र
|
हस्त (१८:४२)
|
योग
|
शोभन (३०:२२)
|
करण
|
तैतिल (९:१८)
|
भारतीय पौष मासारंभ
भारतीय काल
गणनेनुसार पौष मास आरंभ होत आहे.
अयन करिदिन
उत्तरायणानंतरचा
दिवस म्हणून हा करिदिन आहे. ग्रहण दिवस, होळी, आयन दिन (उत्तरायण आणि दक्षिणायनाचा
दिवस), भावुका अमावास्या व प्रेतदाहविधीचा दिवस अशा ५ प्रकारच्या दिवसांच्या
दुसऱ्या दिवसाला करिदिन म्हणतात. हे ५ दिवस व त्यापुढचा म्हणजे करिदिन सर्व शुभ
कार्याला वर्ज समजले जातात.
घबाड
२२:२५ नंतर घबाड योग आहे. हा प्रयाणासाठी
शुभ योग आहे.
सूर्य
नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत (दोन्ही धरून) नक्षत्रे मोजावीत. त्याला ३ ने
गुणून त्यात शुक्ल प्रतिपदेपासून च्या
तिथी मिळवाव्यात व नंतर ७ ने भागावे. बाकी ३ राहिल्यास घबाड असते.
सूर्य
नक्षत्र: मूळ
चंद्र
नक्षत्र : चित्रा
तिथी: कृष्ण १० = १५ + १० = २५
सूर्य
नक्षत्र ते चंद्र नक्षत्र = २३
२३
x ३ = ६९
यात
शुक्ल प्रतिपदेपासूनच्या म्हणजे २५ तिथी मिळवू : ६९ + २५ = ९४
आता
७ ने भागू ९४ / ७ = १३ ३/७
बाकी
३ म्हणून घबाड.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment