तिथी
|
मार्गशीर्ष कृष्ण ८ (२०:१८)
|
वार
|
बुधवार
|
नक्षत्र
|
उत्तराफाल्गुनी (१६:११)
|
योग
|
सौभाग्य (२९:४५)
|
करण
|
बालव (७:२६)
|
कालाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील कृष्ण अष्टमीला कालाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी शिव पूजन शुभ
मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
अनघा व्रत
एक तिथिव्रत. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व
अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करावी व पुढे एक वर्षपर्यंत
प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करावी, असे हेमांद्रीने सांगितले आहे.
फल-पापनाश.
अष्टका-श्राद्ध
मार्गशीर्ष कृष्ण अपराह्न-व्यापिनी
अष्टमीच्या दिवशी शास्त्रोक्त विधीने अष्टका-श्राद्ध करावे. ब्राह्मणभोजन घालून
त्यांचा तोषवावे, त्यामुळे उत्तम फल मिळते, आणि न केल्यास दोष लागतो.
रुक्मिणी अष्टमी
मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीच्या
दिवशी कृष्ण, रुक्मिणी व प्रद्युम्न यांच्या सुवर्णाच्या
मूर्ती करून त्यांचे सुगंधी जलाने आणि गंधादीने पूजन करावे. नैवेद्याला उत्तम
पदार्थ अर्पण करावेत आणि सामर्थ्य असल्यास आठ सुवासिनीना चांगली वस्त्रे देऊन
दक्षिणा द्यावी. यामुळे रुक्मिणीची प्रसन्नता मिळते.
मकरायन
१६:१४ ला रवि सायन मकर राशीत प्रवेश करीत
आहे.
उत्तरायण आरंभ
सूर्याने मकर राशीत प्रवेश
केला, म्हणजे उत्तरायण सुरु होते. तिथपासून सहा राशी भोगून होईपर्यंत उत्तरायण
असते.
या साठी पुण्यकाळ सूर्याने
मकर राशीत प्रवेश केल्या पासून पुढे ४० घटिका असा सांगितला आहे. मात्र यामध्ये रात्रीची वेळ घेत
नाहीत. पुण्याकालात स्नान, दान इ. गोष्टी अधिक शुभ मानल्या आहेत. म्हणून पुण्यकाल १६:१४ ते सूर्यास्त असा आहे.
उत्तर गोलार्धातील सर्वात छोटा दिवस
हा उत्तर गोलार्धातील
सर्वात छोटा दिवस आणि असून रात्र सर्वात मोठी असते.
सौर शिशिरऋतु प्रारंभ
भारतीय सौर काल
गणनेनुसार शिशिर ऋतु आरंभ होत आहे.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment