Thursday, 12 January 2017

दिनविशेष - १३ जानेवारी – २०१७




तिथी
 पौष कृष्ण १ (१४:४०)   
वार
 शुक्रवार
नक्षत्र
 पुष्य (२३:४९)
योग
 विष्कंभ (१९:०३)
करण
 तैतिल (२५:४०)


धनुर्मास समाप्ति

सूर्य धनु राशीत असे पर्यंत म्हणजे मकर संक्रांती पर्यंत असणारा धनुर्मास किंवा झुंझुरमास समाप्त होत आहे.

भोगी

सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून देवाची पूजा करावी . धूतवस्त्र घालून स्वयंपाक करावा. यात तांदूळ व मुगच्या डाळीची खिचडी हा मुख्य पदार्थ असतो. तसेच वांग्याची भाजी व तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी यांचाही समावेश असतो. सूर्यास्त झाल्यावर देवाला व सूर्याला नैवेद्य दाखवून लगेच भोजन करावे.

मृत्यू योग

२३:४९ नंतर शुक्रवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे मृत्यू योग होत आहे.
हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – अनुराधा
सोमवार – उत्तराषाढा
मंगळवार – शततारका
बुधवार – अश्विनी
गुरुवार – मृग
शुक्रवार – आश्लेषा
शनिवार – हस्त

हा योग सामान्यत: अशुभ मनाला जातो. असे असले तरीही
१) हा योग आपल्या प्रांतात पहात नाहीत. हा प्रामुख्याने
हूण, वंग, व खशया प्रांतातच वर्ज मनाला जातो. 
२) शिवाय चंद्रबल असेल तर त्याचा परिहार होऊन मंगलकार्यासाठी या योगाचा दोष रहात नाही.

इष्टि

इष्टि  म्हणजे यज्ञ.
यज्ञ संस्थेतील विविध कामनांच्या पूर्तीसाठी जो विधानात्मक भाग असतो त्यास इष्टि म्हणतात.



सत्पुरुषांचे पुण्यदिन

समाधगिरजी महाराज, सोरडी यांची पुण्यतिथी या दिवशी असते.
श्री भगवान बाबा पुण्यतिथी या दिवशी असते.

प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध

अपराण्ह काळी प्रतिपदा आणि द्वितीया तिथी असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष कृष्ण १ किंवा पौष कृष्ण २ आहे त्यांनी या दिवशी श्राद्ध करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह काळाचे महत्व आहे. श्राद्धतिथी ज्या दिवशी अपराण्ह काळी असते त्या दिवशी ते श्राद्ध करावे.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ, त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३ मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५ मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ पशास्त मानवा.


संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट

No comments:

Post a Comment