तिथी
|
पौष शुक्ल ८ (१२:२६)
|
वार
|
शुक्रवार
|
नक्षत्र
|
रेवती (१५:४५)
|
योग
|
शिव (२२:५१)
|
करण
|
बालव (२३:२७)
|
दुर्गाष्टमी
प्रत्येक
महिन्यातील शुक्ल अष्टमीला दुर्गाष्टमी साजरी केली जाते. या दिवशी दुर्गामातेचे पूजन
शुभ मानले जाते. शुक्ल पक्षातील अष्टमीला शिव पूजन निषिद्ध मानले जाते.
जयंतिअष्टमी
पौष शुक्ल अष्टमी
दिवशी बुधवार असून जर भरणीनक्षत्र असेल तर ती 'जयंती' होते. त्या दिवशी स्नान, दान, जप, होम, देवर्षिपितृतर्पण केल्यास, ब्राह्मणभोजन घातल्यास कोटिपट फळ मिळते.
महाभद्राष्टमी
पौष शुक्ल
अष्टमीला बुधवार असेल तर त्या दिवशी स्नानदानादी गोष्टींनी शंकर प्रसन्न होतात, असा विश्वास आहे.
शाकंबरी देवी उत्सवारंभ
शाकंबरी देवीचा उत्सव आरंभ
होत आहे. पौष शुक्ल नवमीस नवरात्र स्थापन करतात. सर्व विधान
देवीनवरात्राप्रमाणेच असते. शाकंभरीस बनशंकरी असेही नाव आहे. बदामी येथे
बनशंकरीदेवीचे मंदिर आहे. ही अनेक लोकांची कुलदेवता आहे. ही नवसाला पावते. या वेळी
मोठा रथोत्सव असतो. नवरात्रसमाप्ती पौर्णिमेस होते.
अमृत योग
१५:४५ पर्यंत शुक्रवारी
रेवती नक्षत्र असल्यामुळे अमृतसिद्धी योग होत आहे.
हा शुभ योग आहे. हा योग नक्षत्र आणि वार यांच्या संयोगाने हा योग होतो. पुढील स्थिती मध्ये हा योग होतो.
रविवार – हस्त
|
सोमवार – मृग / श्रवण
|
मंगळवार – अश्विनी
|
बुधवार – अनुराधा
|
गुरुवार – पुष्य
|
शुक्रवार – रेवती
|
शनिवार – रोहिणी
|
|
हा सामन्यात:
सर्व कार्यास शुभ योग आहे. मात्र काही अमृत योग ठराविक कार्यास वर्ज असतात.
गुरुवार – पुष्य
|
विवाहास वर्ज
|
शनिवार – रोहिणी
|
प्रयाणास वर्ज
|
मंगळवार – अश्विनी
|
गृहप्रवेशास वर्ज
|
दग्ध योग
१२:२६ पर्यंत शुक्रवारी
अष्टमी तिथी असल्यामुळे दग्ध योग होत आहे.
तिथी आणि वार
यांच्या संयोगाने दग्ध योग होतो. हा सर्व शुभ कार्यास वर्ज आहे. पुढील स्थिती
मध्ये हा योग होतो.
रविवार – द्वादशी
|
सोमवार – एकादशी
|
मंगळवार – पंचमी
|
बुधवार - तृतीया
|
गुरुवार – षष्ठी
|
शुक्रवार – अष्टमी
|
शनिवार – नवमी
|
|
नवमी श्राद्ध
अपराण्ह काळी नवमी तिथी
असल्यामुळे, ज्यांची श्राद्ध तिथी पौष शुक्ल ९ आहे त्यांनी या दिवशी श्राद्ध
करावे.
श्राद्धकृत्यांमध्ये अपराण्ह
काळाचे महत्व आहे. श्राद्धतिथी ज्या दिवशी अपराण्ह काळी असते त्या दिवशी ते
श्राद्ध करावे.
सुर्योदयापासून ३ मुहूर्त प्रत:काळ,
त्यानंतर ३ मुहूर्त संगव काळ, त्यानंतर ३ मुहूर्त मध्यान्ह काळ, त्यानंतर ३
मुहूर्त अपराण्ह काळ व नंतरचे ३ मुहूर्त सायंकाळ असतो. अशा रीतीने दिवसाच्या १५
मुहूर्तांचे पाच विभाग केले आहेत. या पैकी सायंकाळ बहुदा सर्व कामांना प्रशस्त
नाही. तर श्राद्ध कर्मासाठी अपराण्हकाळ पशास्त मानवा.
सत्पुरुषांचे पुण्यदिन
विष्णुदास पुरुषोत्तमानंद
स्वामी यांची पुण्यतिथी या दिवशी असते
विष्णुदास कवि, माहूर यांची
पुण्यतिथी या दिवशी असते.
संदर्भ :
दाते पंचांग
सुलभ ज्योतिष शास्त्र
इंटरनेट
No comments:
Post a Comment